Jaipur: अचनाक घरी आला प्रेयसीचा पति, पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याने प्रियकराने गमावला जीव

राजस्थान मधील जयपुर मध्ये आपल्या प्रेयसीच्या नवऱ्यापासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने चक्क इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jaipur: अचनाक घरी आला प्रेयसीचा पति, पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याने प्रियकराने गमावला जीव
Death (Photo Credits-Facebook)

Jaipur: राजस्थान मधील जयपुर मध्ये आपल्या प्रेयसीच्या नवऱ्यापासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने चक्क इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इमारतीवरुन उडी मारल्याने 29 वर्षीय प्रियकराचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली आहे.(Uttar Pradesh Shocker: 45 वर्षीय महिलेवर दारुच्या नशेत बलात्कार, आरोपीला अटक)

मृताची ओळख उत्तर प्रदेशात राहणारा मोहसिन रुपात पटली आहे. एका विवाहित महिलेसोबत तो लिव-इन-रिलेशनशिप मध्ये होता. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही महिलांच्या अल्पवयीन मुलीसोबत तो प्रताप नगर येथेील एका इमारतीत भाड्याने राहत होता. महिला दोन वर्षांपूर्वी मोहसिन याच्या सोबत नैनीताल येथून पळून आली होती.

पोलिसांनी असे म्हटले की, तिचा नवरा त्याचा शोध घेत होता. परंतु त्याला जयपुर येथे अखेर शोध लागला. रविवारी महिलेचा नवरा हा मोहसिन याच्या घरी गेला. जेथे त्याची बायको सुद्धा त्याच्यासोबत राहत होती. त्याला पाहून मोहसिन हा घाबरला आणि घराच्या बालकनीतून त्याने खाली उडी मारली. याच दरम्यान तो गंभीर जखमी झाला.(Shocking! आई-मुलाच्या नात्याला काळिमा; सतत रडते म्हणून आईने आपल्या 27 दिवसांच्या बाळाचे डोके भिंतीवर आपटून मारून टाकले)

प्रताप नगर ठाण्याचे प्रभारी बलवीर सिंह यांनी म्हटले की, महिला त्याल शासकीय रुग्णालयात घेऊन गेली. परंतु सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मोहसिन आणि महिला काही दिवसांपूर्वीच एनआरआय सर्कल जवळच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. त्यांनी असे सांगितले की, यापूर्वी ते येथील दुसऱ्या परिसरात राहत होते.

महिला आणि तिचा नवरा बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांनी असे म्हटले की, मंगळवारी शवविच्छेदन केल्यानंतर मोहसिन याचा मृतदेह परिवाराकडे सोपण्यात आला.

(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2021 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).