Representational Image (Photo Credits: Pixabay)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशात आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. तर मथुरा येथील एका 45 वर्षीय महिलेवर दारुच्या नशेत बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.(Shocking! आई-मुलाच्या नात्याला काळिमा; सतत रडते म्हणून आईने आपल्या 27 दिवसांच्या बाळाचे डोके भिंतीवर आपटून मारून टाकले)

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, पीडितेने तक्रारीत असे म्हटले की व्यक्ती घरात जबरदस्तीने घरात घुसला. ही घटना रविवार दुपारी 3 वाजताची आहे. आरोपीने महिलेला पकडले आणि तिचे हातपाय बेडला बांधले. त्याचवेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती होता जो घराबाहेर थांबून तेथून कोणी आले तर सांगण्यासाठी त्याला ठेवण्यात आले होते.(Chennai Shocker: बयकोसोबत भांडण झाले म्हणून व्यक्तीने केली 7 वर्षीय मुलीची हत्या)

या सर्व प्रकारानंतर आरोपीने पीडितेला याचा विरोध केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा दिली. महिलेला वैद्यकिय चाचणीसाठी पाठवले आणि आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. आरोपीच्या विरोधात भारतीय संविधानाच्या विविध कायद्यानुसार कलम लावण्यात आले आहेत.