Jaipur Fake Jewellery Scam: केवळ 300 रुपयांचे दागिने 6 कोटींना विकले; जयपूरमध्ये ज्वेलर्सकडून परदेशी महिलेची फसवणूक, गुन्हा दाखल

ज्यामध्ये अनेक दगड आणि सोन्याचे दागिने होते. हे दागिने बनावट असल्याचे समोर आल्यानंतर, चेरिशने ताबडतोब जयपूर गाठले आणि दुकान मालक गौरव सोनी याची चौकशी केली. जेव्हा त्याने आरोप नाकारले.

Jaipur Fake Jewellery Scam

Jaipur Fake Jewellery Scam: राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राजेंद्र सोनी आणि गौरव सोनी या ज्वेलर्स पिता-पुत्राने एका परदेशी महिलेची सहा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ही बाब समोर आल्यानंतर हे दोघे फरार झाले आहेत. जयपूर हे शहर रत्ने आणि कलाकुसरीच्या दागिन्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. दागिने खरेदी करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात. साधारण दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील व्यावसायिक महिला चेरिश दागिने खरेदी करण्यासाठी जयपूरला पोहोचली होती आणि तिने एका ज्वेलर्सच्या दुकानातून दागिनेही खरेदी केले होते.

मात्र धूर्त पिता-पुत्राने केवळ 300 रुपयांचे दागिने तिला 6 कोटींना विकले. या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेतील एका प्रदर्शनात या महिलेने तिचे दागिने दाखविले तेव्हा हे दागिने बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर  फसवणुकीचा बळी ठरलेल्या अमेरिकन चेरिशने जयपूरच्या माणक चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस जेव्हा ज्वेलर्सच्या दुकानावर पोहोचले तेव्हा पिता-पुत्र फरार झाल्याचे समजले. त्यानंतर बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या आरोपी नंदकिशोरला मानक चौक पोलिसांनी अटक केली.

अहवालानुसार, चेरिशने 2022 मध्ये जयपूरमधील रामा रोडियम शॉपमधून 6 कोटी रुपयांचे दागिने खरेदी केले होते. ज्यामध्ये अनेक दगड आणि सोन्याचे दागिने होते. हे दागिने बनावट असल्याचे समोर आल्यानंतर, चेरिशने ताबडतोब जयपूर गाठले आणि दुकान मालक गौरव सोनी याची चौकशी केली. जेव्हा त्याने आरोप नाकारले. त्यानंतर चेरिशने पोलीस तक्रार दाखल केली आणि यूएस दूतावासाकडून मदतही मागितली. (हेही वाचा: प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा, पत्नी पवित्रा गौडा यांना हत्येप्रकरणी अटक)

त्यानंतर सोनी पिता-पुत्र फरार झाले. आता या प्रकरणी जयपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चेरिश 2022 मध्ये इंस्टाग्रामवर गौरव सोनीला भेटली होती. त्यानंतर तिने त्यांच्या दुकानातून 6 कोटीचे दागिने विकत घेतले. याधीही जयपूरमधून फसवणुकीच्या अशा घटना समोर आल्या आहेत. याबाबत पोलीसही सतर्क झाले आहेत.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

IND W vs WI W, 1st T20I Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 196 धावांचे मोठे लक्ष्य, जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांची शानदार अर्धशतके

India Women vs West Indies Women, 1st T20I Match Live Toss Update: वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI