IRCTC रामायण एक्सप्रेस सुरु करणार, प्रवाशांना भजन-किर्तनाचा आनंद घेता येणार

भारतीय रेल्वेकडून होळीसाठी काही खास ट्रेनची सुविधा उपलब्ध प्रवाशांना करुन देण्यात आली आहे. तर होळीनंतर आता एक स्पेशल ट्रेन सुरु करणार असून त्याची थीम रामायणावर आधारित असणार आहे.

IRCTC रामायण एक्सप्रेस सुरु करणार, प्रवाशांना भजन-किर्तनाचा आनंद घेता येणार
Representational Image | Indian Railways (Photo Credits: PTI)

भारतीय रेल्वेकडून होळीसाठी काही खास ट्रेनची सुविधा उपलब्ध प्रवाशांना करुन देण्यात आली आहे. तर होळीनंतर आता एक स्पेशल ट्रेन सुरु करणार असून त्याची थीम रामायणावर आधारित असणार आहे. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला भजन-किर्तनाचा आनंद घेता येणार आहे. खरंतर रामायण एक्सप्रेस मध्ये भजन-किर्तन ऐकवणारे ऑडिओ आणि व्हिडिओ यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना भगवान रामासंबंधित तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

रामायण एक्सप्रेस होळी नंतर म्हणजेट 28 मार्चला लॉन्च करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमॅन वी. के. यादव यांनी या ट्रेनबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, या ट्रेनचे डिझान एका तीर्थक्षेत्रासारखे करण्यात आले आहे. ट्रेनच्या आतमध्ये भजन-किर्तनाचे ऑडिओ आणि व्हिडिओ व्यवस्था करण्यात आली आहे.(Google Station प्रकल्प बंद; आता रेल्वे स्थानकांवर नाही मिळणार Free WiFi सेवा)

मध्य रेल्वे कडून होळी आणि लॉंग विकेंड दरम्यान कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष ट्रेन्स चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासियांसाठी होळी/ शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष 20 ट्रेन्स चालवणार आहेत. मुंबई - करमाळी आणि पनवेल - करमाळी या स्थानकांदरम्यान स्पेशल ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.कोकणात जाणार्‍या होळी स्पेशल ट्रेन्ससाठी मोबाईलवरून युटीएस अ‍ॅपवरून तिकीट बुक करता येऊ शकते. सोबतच irctc.com वर देखील तिकीटांचं बुकिंग 14 फेब्रुवारीपासून खुले होणार आहे. तसेच या स्पेशल ट्रेन्समध्ये सेकंड क्लास कोचेस हे अनारक्षित राहणार आहेत. त्यामुळे तिकिटं न काढता या डब्बामधून प्रवाशांना थेट प्रवास करता येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2020 06:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).