VHP Files Complaint Against Twitter: हिंदू देवी काली माता हिच्या विरोधात अपमाजनक पोस्ट, वीएचपी कडून ट्विटरच्या विरोधात दाखल केला गुन्हा
सोशल मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर ईरानचे मूळ कॅनेडियन लेखक अरमीन नवाबी (Armin Navabi) यांनी हिंदू देवीच्या विरोधात अपमानजनक पोस्ट लिहिल्याच्या विरोधात दिल्ली आणि मुंबईत ट्विटरच्या (Twitter) विरोधात गुन्हा दाखल केला आहे
सोशल मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर ईरानचे मूळ कॅनेडियन लेखक अरमीन नवाबी (Armin Navabi) यांनी हिंदू देवीच्या विरोधात अपमानजनक पोस्ट लिहिल्याच्या विरोधात दिल्ली आणि मुंबईत ट्विटरच्या (Twitter) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा विश्व हिंदू परिषद (VHP) मधील प्रवक्ते विनोद बंसल यांनी दाखल केला आहे. त्यांनी अशी मागणी केली आहे की, अशा लोकांच्या विरोधात कारवाई करायला हवी. ही पोस्ट ट्विटरवर सप्टेंबर महिन्यात करण्यात आली आहे. त्यानंतर भारतात या ट्विट वरुन विरोध केला जात आहे.
कॅनेडियन लेखक अरमीन नवाबी यांनी देवी देवतांच्या विरोधात अपमानजनक असे ट्वीट केल्याने विनोद बंसल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, या लेखकाच्या विरोधात दिल्ली आणि मुंबईत औपचारिक तक्रार केली आहे. त्यांनी त्यांचे ट्वीट गृह मंत्रालय, भारतातील इरान आणि कॅनडाचे राजदूत यांना सुद्धा टॅग केले आहे. या व्यतिरिक्त तक्राराची प्रत सुद्धा कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि इरानचे राष्ट्रपती हसन रुहानी यांना पाठवली आहे.(Snake-Rats Playing Together on Lord Ganesh Idol Viral Video: गणपती बाप्पाच्या मूर्तीवर साप आणि उंदीर यांचा एकत्र वावर; पहा या दुर्मिळ नजाराच्या व्हायरल व्हिडीओ!)
खरंतर अर्मिन नवाबी नावाच्या एका व्यक्तिने हिंदुंचे आराध्य दैवत असलेल्या देवी काली माता हिची एक घाणेरडा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यामधून हिंदूंच्या भावनांसोबत वाईट लिहिल्याने एथीस्ट रिपब्लिकचे संस्थापक अर्मिन नवाबी यांनी काली मातेचा एक वाईट फोटो शेअर करत असे म्हटले होते की, मला हिंदू बद्दल प्रेम आहे. मला माहिती नव्हते तुमच्याकडे या सारख्या सेक्सी देव्या आहेत. कोणताही व्यक्ती अन्य धर्म का निवडेल?
तर अर्मिन नवाबीच्या या ट्विट नंतर लोकांनी काली मातेचा अपमान केल्याने संताप व्यक्त केला आहे. लोकांनी अशी मागणी केली आहे की, अशा लोकांच्या विरोधात कारवाई व्हावी.
वीएचपी प्रवक्ता विनोद बंसल यांनी ट्विटरच्या विरोधा आरोप लावला आहे की, हिंदू देवी देवतांच्या विरोधात अशा पद्धतीचे ट्वीट करुन हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे समाजात अशांती निर्माण केली जाईल. ट्विटरचे अधिकाऱ्यांकडे अशी मागणी केली आहे की, लवकरात लवकर कारवाई केली जावी. त्यामुळे अशा पद्धतीचे पोस्ट पुढे सुद्धा सोशल मीडियात करण्यापूर्वी घाबरतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)