IPL Auction 2025 Live

Intranasal Vaccine in India: भारतीय बनावटीची पहिली नाकावाटे दिली जाणारी लस iNCOVACC 26 जानेवारीला होणार लॉन्च

भारत बायोटेक कडून नाकावाटे दिली जाणारे iNCOVACC ही लस भारतामध्ये 26 जानेवारी अर्थात 74व्या प्रजासत्ताक दिनी लॉन्च केली जाणार आहे.

कोरोना वैक्सीन (Photo credits: PTI)

भारत बायोटेक कडून नाकावाटे दिली जाणारे iNCOVACC ही लस भारतामध्ये 26 जानेवारी अर्थात 74व्या प्रजासत्ताक दिनी लॉन्च केली जाणार आहे. कंपनीच्या CMD Krishna Ella यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे. या लसीला Central Drugs Standard Control Organisation कडून यापूर्वीच मंजूरी मिळालेली आहे. भारतामध्ये नाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीमध्ये ही पहिलीच लस आहे.

भारतामध्ये सुरूवातीला ही लस केवळ खाजगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याची किंमत 800 रूपये असणार आहे. तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस उपलब्ध झाल्यानंतर त्यासाठी नागरिकांना 325 रूपये मोजावे लागणार आहेत. नक्की वाचा: Bharat Biotech च्या कोविड 19 वरील नाकावाटे दिल्या जाणार्‍या iNCOVACC लसीच्या बुस्टर डोसला DCGI कडून हिरवा कंदिल .

8th edition of the India International Science Festival (IISF) मध्ये बोलताना Krishna Ella यांनी भारत बायोटेक निर्मित नाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची माहिती दिली आहे. त्यांनी आपण 26 जानेवारीपासून ही लस उपलब्ध करत असल्याची घोषणा देखील केली.

नाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीच्या माध्यमातून नाकातील आतल्या बाजूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली जाणार आहे. कोरोना वायरस नाकावाटे शरीरात जाण्याचा नाक हा एक मार्ग आहे. त्याला या लसी द्वारा रोखलं जाणार आहे. नाकावाटे लस देण्याच्या मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणात बायो मेडिकल  कचरा ज्यामध्ये इंजेक्शन, सिरीन यांचा समावेश होतो तो कमी होण्यास मदत होणार आहे. सूईची भीती असल्याने जे लसीकरणापासून दूर होते त्यांनाही कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेता येणार  आहे.

दुसरा डोस घेतल्यांना त्यांच्या या डोस नंतर 6 महिन्यांनी नेसल व्हॅक्सिन घेता येणार आहे.