International Film Festival 2020: येत्या 16-21 जानेवारी दरम्यान गोव्यात ऑनलाईन पद्धतीने पार पडणार 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- प्रकाश जावडेकर
माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी गोव्यात (Goa) पार पडणारा 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव येत्या 16-21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे.
International Film Festival 2020: माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी गोव्यात (Goa) पार पडणारा 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव येत्या 16-21 डिसेंबर दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आयोजित केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. गोव्यात होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलची सांगता आणि निरोप समारंभ ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. मात्र त्यावेळी अत्यंत मोजक्याच जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.(Arundhati Gold Scheme: अरुंधती गोल्ड स्किमच्या माध्यमातून नववधूला सरकार देणार 10 ग्रॅम सोने, लाभ घेण्यासाठी येथे अधिक जाणून घ्या)
आंतरराष्ट्रीय कोरोना व्हायरस शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आज दिल्लीत पार पडल्याचे प्रकाश जावडेकर यांनी पुढे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 21 नॉन-फिचर फिल्मचा समावेश करण्यात आला आहे. या फिल्म फेस्टिव्हलसाठी रजिस्ट्रेशन 16 जानेवारी ते 24 जानेवारी,2021 पर्यंत सुरु असणार आहेत. मात्र रजिस्ट्रेशन वेळी First Come Fist Serve नुसार मर्यादित लोकांनाच यामध्ये सहभागी होता येणार आहे. तर कोरोनाची सद्यची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे ही प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.(ऐतिहासिक Qutub Minar मध्ये पूजा-अर्चना करण्याची मागणी; 27 हिंदू-जैन मंदिरे फोडून कुतुब मीनार उभारल्याचा दावा)
Tweet:
यंदा 51वे वर्ष असून फिल्म फेस्टिव्ह एकूण 9 दिवस असणार असल्याचे गोव्याचे एन्टरटेंमेंट सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. यापूर्वी गोवा फिल्म फेस्टिव्हल नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला होता. मात्र कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता तो पुढे ढकलण्यात आला.