Car Swept In Flooded Rivulet at Hoshiarpur: पंजाबमधील होशियारपूरमध्ये नदीत वाहून गेली इनोव्हा कार; 8 जणांचा मृत्यू, एक बेपत्ता

परंतु, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पाण्यातून कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

Car Swept In Flooded Rivulet at Hoshiarpur (फोटो सौजन्य -X/@amitsri32137925)

Car Swept In Flooded Rivulet at Hoshiarpur: रविवारी पंजाब (Punjab) च्या होशियारपूर (Hoshiarpur) पासून सुमारे 34 किमी अंतरावर असलेल्या जैजॉन (Jaijon) येथे पावसाळी नदीत कार वाहून गेल्याने एका कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता झाला आहे. पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) च्या चालकासह कुटुंबातील 11 सदस्य हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मेहतपूरजवळील डेहरा येथून पंजाबच्या एसबीएस नगर जिल्ह्यातील मेहरोवाल गावात लग्न समारंभासाठी जात होते.

प्राप्त माहितीनुसार, जैजॉनमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याने भरलेली छोटी नदी पार करताना इनोव्हा कार वाहून गेली. पाण्याच्या जोरदार लाटांमुळे काही स्थानिक लोकांनी ड्रायव्हरला नदी न ओलांडण्याचा इशारा दिला. परंतु, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पाण्यातून कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी कसेबसे वाहनातून प्रवास करणाऱ्या दीपक भाटिया यांना वाचवले. (हेही वाचा - Khed Man Swept Away In Sheldi Dam: चिपळूण येथील शेलडी धरणात 32 वर्षांचा तरुण वाहून गेला (Watch Video))

या घटनेच्या व्हिडिओमध्ये हे वाहन पाण्याने भरलेल्या नदीत अडकलेले दिसत आहे. होशियारपूरचे उपायुक्त कोमल मित्तल यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे एक पथक बचाव कार्यात आणि बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले की, नदीतून पाच महिलांसह नऊ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर बेपत्ता झालेल्या प्रवाशाचा शोध सुरू आहे. या गाडीत 12 जण प्रवास करत होते, असे मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. (हेही वाचा - Chandrapur: पुराच्या पाण्यात कार गेली वाहून , पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

पहा व्हिडिओ - 

सुरेंद्र लांबा यांनी सांगितले की, या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी चालकाला थांबण्यास सांगितले, मात्र त्याने वाहन पुढे नेले. त्यामुळे ही दुर्घटना घडली. पोलिस उपअधीक्षक जागीर सिंह यांनी सांगितले की, पाण्याच्या प्रवाहामुळे वाहन सुमारे 200 मीटर वाहून गेले. सुरजीत भाटिया, त्यांची पत्नी परमजीत कौर, भाऊ स्वरूप चंद, वहिनी, भाची भावना आणि अनु, भाचा हर्षित आणि ड्रायव्हर बिंदू अशी मृतांची नावे आहेत.