Mumbai Ayodhya Flight: IndiGo कडून 11 जानेवारी पासून नियमित उडणार मुंबई- अयोद्धा फ्लाईट!
30 डिसेंबर दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Maryada Purshottam Shri Ram International Airport चं उद्घाटन होणार आहे.
IndiGo कडून आता अयोद्धेमधील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनापूर्वी मुंबई-अयोद्धा विमान सेवेची (Mumbai Ayodhya Flight) घोषणा करण्यात आली आहे. 15 जानेवारीपासून दररोज मुंबई ते अयोद्धा अशी विमानसेवा चालवली जाणार आहे. मुंबई मधून हे विमान दुपारी 12.30 वाजता टेक ऑफ करेल तर अयोद्धेला 2.45 वाजता पोहचणार आहे. तसेच अयोद्धे वरून 3.15 वाजता विमान टेक ऑफ करून मुंबई मध्ये 5.40 ला पोहचणार आहे.
इंडिगो कडून यापूर्वी दिल्ली आणि अहमदाबाद वरून थेट विमानसेवेची घोषणा केली होती. 30 डिसेंबर दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Maryada Purshottam Shri Ram International Airport चं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 6 जानेवारीला दिल्ली आणि 11 जानेवारीला इंडिगो थेट विमानसेवा सुरू करत आहे. हे देखील नक्की वाचा: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून अयोद्धेतील राम मंदिराचे फोटो शेअर (See Pics) .
दरम्यान 22 जानेवारीला राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लांची मूर्ती विराजमान केली जाणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार्या या सोहळ्याकडे तमाम हिंदू धर्मीयांचे डोळे लागले आहेत. सध्या या राम मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोद्धा नगरीमध्ये तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. अनेक राम भक्त या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तेथे पोहचणार आहेत. त्यांच्यासाठी खास ट्रेन देखील सोडली जाणार आहे.
राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येला भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. सुप्रीम कोर्टाने जुनी बाबरी मशीद-रामजन्मभूमी संघर्षाचा निकाल दिल्यानंतर जवळपास नऊ महिन्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि आता ते पूर्णत्त्वास आले आहे.