U19 Women Asia Cup 2024: भारतीय मुलींनी केला चमत्कार, आशिया कप जिंकून बांगलादेशकडून बदला घेतला

ब्युमास ओव्हल, क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 76 धावांवर गडगडला.

Photo Credti- X

U19 Women Asia Cup 2024: भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी महिला अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करून बदला घेतला. ब्युमास ओव्हल, क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 76 धावांवर गडगडला. नाणेफेक हारल्यानंतर भारताने सात विकेट्सवर 117 धावांचे लक्ष बांगलादेश समोर ठेवले होते. भारताकडून डावाची सुरुवात करताना त्रिशाने 47 चेंडूत 52 धावा केल्या. त्याशिवाय, मिथिला विनोदने 12 चेंडूत 17 धावा करत अखेरचे महत्त्वाचे योगदान दिले. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज फरजाना इस्मीनने 4 षटकांत 4 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर फाहोमिदा चोया आणि झुरिया फिरदौस यांनी संघाकडून सर्वाधिक 18 आणि 22 धावा केल्या.

भारतीय महिला संघाचा बांगलादेशवर दणदणीत विजय