भारतीय तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानची 'अल मदीना' बोट, 500 कोटीचे ड्रग्ज जप्त
भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) गुजरात (Gujrat) जाखाऊ किनाऱ्याजवळ पाकिस्तानची (Pakistan) 'अल मदीना' ही बोट पकडली आहे.
भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) गुजरात (Gujrat) जाखाऊ किनाऱ्याजवळ पाकिस्तानची (Pakistan) 'अल मदीना' ही बोट पकडली आहे. या बोटीत 194 ड्रग्जची पाकिटे सापडली असून तब्बल 500 कोटी रुपये एवढी त्याची किंमत आहे.
अल मदीना ही बोट आंतरराष्ट्रीय समुद्र सीमारेषेवर थांबलेली दिसली. त्यावेळी भारतीय तटरक्षक दलाकडून एक जहाज आणि दोन इंटरसेप्टर पाठवण्यात आल्या. याबद्दल तटरक्षक दलाला सूत्रांकडून माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.(बालाकोट परिरात भारतीय वायुसेनेकडून करण्यात आलेला एअरस्ट्राईक हे मोठ यश - लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग)
बोट थांबली असताना अल मदीनाच्या काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यावेळी बोटीतून बॅगा खाली टाकण्यात येत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी सात बॅग समुद्राच्या पाण्यातून वर काढण्यात आल्या असून बोटीवरील व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.