Indian Army Recruitment 2021: भारतीय सेनेत एनसीसी स्पेशल एन्ट्री मध्ये 55 रिक्त, 28 जानेवारी पर्यंत करता येईल अर्ज
कारण सेनेकडून एनसीसी स्पेशल एन्ट्री मध्ये एप्रिल 2021 सुरु होणाऱ्या 49 व्या कोर्ससाठी जाहिरात दिली गेली आहे
Indian Army Recruitment 2021: भारतीय सेनेत नॅशनल कॅडेट कोर (NCC) स्पेशल एन्ट्रीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण सेनेकडून एनसीसी स्पेशल एन्ट्री मध्ये एप्रिल 2021 सुरु होणाऱ्या 49 व्या कोर्ससाठी जाहिरात दिली गेली आहे. सेनेत एनसीसी एन्ट्रीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना भारतीय सेनेचे पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. (Mazagon Dock Recruitment 2021: माझगाव डॉक येथे ट्रेड अॅप्रेंटिस पदांसाठी नोकरभरती; 8 वी, 10 वी पास विद्यार्थी करू शकतात अर्ज, जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, पदांची नावे व पगार)
उमेदावारांनी लक्षात ठेवावे की, अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2021 दिली गेली आहे. अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी मधून कमीतकमी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत एनसीसीचे सर्टिफिकेट वर B ग्रेड उत्तीर्ण पर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच वय 1 जानेवारी 2021 ला 19 वर्षाहून कमी किंवा 25 वर्षाहून अधिक नसले पाहिजे.
सेनेमध्ये एनसीसी स्पेशल एन्ट्री 2021 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भारतीय सेनेच्या भरती पोर्टलवर भेट देत New registration लिंकवर क्लिक करावे. यानंतर मागितलेली माहिती देत अर्ज करुन नोंदणी करावी लागणार आहे.(CBSE Board Exam Dates 2021: सीबीएसईच्या 10 वी, 12 वी परीक्षांच्या तारखा जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती)
उमेदवारांची निवड एसएसबीच्या दोन टप्प्यात होणार असून त्यांच्या गुणवत्तेनुसार होणार आहे. उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट करन त्यांना प्रयागराज, भोपाळ, बंगळुरु आणि कपूरथला येथील निवड केंद्रातील दोन टप्प्यात आयोजित केल्या जाणाऱ्या एसएसबीसाठी बोलावले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात सहभागी करुन घेतले जाणार आहे.