Covid-19 च्या निदानासाठी आता भारतीय लष्करातील श्वानपथक देखील होतयं सज्ज, प्रशिक्षण सुरू; जाणून घ्या डॉग स्क्वॉड कसे ओळणार कोरोनाबाधित रूग्ण!
आतापर्यंत 3000 सॅम्पलचे स्क्रिनिंग झाले आहे. आतापर्यंत 18 सॅम्पल हे कोरोनाबाधित असल्याचे श्वान पथकाच्या डिटेक्शनमधून समोर आले आहे.
भारतीय लष्कराकडून आता कोविड 19 निदानासाठी श्वान पथकातील दोन जणांना ट्रेनिंग दिलं जात आहे. Chippiparai आणि Cocker Spaniel हे दोघं आता रूग्णाच्या शरीरातील घाम आणि मूत्र यांना हुंगून ते कोरोनाबाधित आहेत की नाही याचे संकेत देणार आहेत. दरम्यान कालच त्याचे प्रात्याक्षिक पार पडलं असून डॉग स्क्वॉड्सच्या मदतीने ते कितपत शक्य आहे याची माहिती घेण्यात आली आहे. यामध्ये कुत्र्यांना मानवी शरीरातून बाहेर पडणार्या मूत्र आणि घामातील विशिष्ट बायोमार्कर्स हुंगून त्याचं ट्रेनिग देण्यात आलं आहे. त्यामुळे या सॅम्पल्सच्या आधारे कोरोनाबाधित रूग्ण वेगळे करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
Colonel Surender Saini श्वान पथकाला प्रशिक्षित करत आहेत. लॅबराडोर आणि Chippiparaiजातीच्या कुत्र्यांना मूत्राच्या सॅम्पल वरून तर Cocker Spaniels ला घामाच्या सॅम्पलवरून प्रशिक्षित करण्याचं काम सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सॅम्पल डाटा वरून सेन्सिटीव्हिटी ही 95% पेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. श्वान पथकाने रिअल टाईम डिटेक्शन देखील केले आहे. दरम्यान या मध्ये कुत्र्यांना संसर्गाचा धोका नाही. ट्रायल्समध्येही स्टरलाईज केलेल्या सॅम्पलचा वापर करण्यात आला होता म्हणजे त्यात थेट वायरसचा समावेश नव्हता.केवळ volatile metabolic biomarker होते. हे कोवीड 19 चे सिग्नेचर असतात.
ANI Tweet
जगात ब्रिटन, फिनलॅन्ड, रशिया, फ्रान्स,युएई, जर्मनी, लेबानॉन मध्ये रेल्वे आणि विमानतळावर प्र्वाशांच्या स्क्रिनिंगमध्ये कोविड 19 निदानासाठी श्वास पथकाचा वापर करण्यासाठी ट्रेनिंग सुरू करण्यात आलं आहे. Coronavirus In Pune: सशस्त्र दलातील कोविड रुग्णांसोबतच सामान्य पुणेकरांवर Army Institute of Cardio Thoracic Sciences मध्ये कोरोनाचे उपचार.
भारतामध्येही कंट्रोल्ड कंडिशन मध्ये कुत्र्यांचं ट्रेनिंग आणि ट्रायल झाले अअहे. आतापर्यंत 3000 सॅम्पलचे स्क्रिनिंग झाले आहे. आतापर्यंत 18 सॅम्पल हे कोरोनाबाधित असल्याचे श्वान पथकाच्या डिटेक्शनमधून समोर आले आहे.