भारतीय सैन्यामधील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर
याचाच आदर्श समोर ठेऊन भारतीय सैन्यामधील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
देशाच्या सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवांनाचे कार्य फार मोलाचे आहे. याचाच आदर्श समोर ठेऊन भारतीय सैन्यामधील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर करण्यात आली आहे. शौर्य चक्र देण्यात येणाऱ्या जवानांमध्ये जाट रेजिमेंटचे नायब सुभेदार सोमबीर यांनी खासकरुन जम्मी-कश्मीर मध्ये एका विदेशी दहशतवाद्याला ठार केले होते.
नायब सोमबीर यांच्यासह अन्य पाच जणांना सुद्धा शौर्य चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये ज्योती लामा, मेजर केबी सिंग, नायब सुभेदार एन सिंग, नाईक एस कुमार आणि शिपाई के. ओराओन यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.(26 जानेवारीपूर्वी सर्व बॉर्डरवर 15 दिवसांचा अलर्ट जारी; दहशतवादी सहा मार्गांनी करू शकतात हल्ले, 24 तास पाळत)
ANI Tweet:
त्याचसोबत महाराष्ट्र पोलीस दलाच्या 54 अधिकाऱ्यांना सुद्धा विविध पदकांनी सन्मान करण्यात येणार आहे. यामधील 10 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच सर्वोत्तम कामगिरीसाठी 40 पोलिसांना आणि 4 अधिकाऱ्यांना पोलीस दलातर्फे शौर्य पदक दिले जाणार आहे.