Indian Air Force Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह या दिग्ग्ज नेत्यांना ट्विटद्वारे हवाई दलाच्या योद्धांना दिल्या 88 व्या भारतीय वायु सेना दिनाच्या शुभेच्छा
या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
Indian Air Force Day 88th Anniversary: आपल्या भारतभूमीच्या रक्षणासाठी एखाद्या पहाडासारखे उभे असलेल्या आणि शत्रूशी हवाईमार्गे युद्ध करणा-या भारतीय वायुसेनेच्या वीर योद्धांचे स्मरण करण्यासाठी देशभरात 8 ऑक्टोबर हा दिवस 'भारतीय वायुसेना दिवस' (Indian Air Force Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार यंदाचे हे भारतीय वायु सेना दलाचे 88 वे वर्ष आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
भारतीय वायु सेना दिनानिमित्त सर्व वीर योद्धांचे अभिनंदन करत तुम्ही न केवळ देशाचे अथांग आकाश सुरक्षित ठेवता तर आपत्कालीन परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण देखील वाचवतात. त्यांचे हे साहस, शौर्य आणि समर्पण सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वायुसेनेच्या शूर वीरांचा सन्मान करणे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'गेली 88 वर्षे त्याग, समर्पण आणि प्रामाणिकपणाने काम करणा-या वायुसेनेचा हा ऐतिहासिक प्रवास वाखाणण्याजोगा आहे असे म्हटले आहे.
तर गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपल्या देशाची आकाशमार्गे अविरत सेवा करणा-या आणि वेळ प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या भारतीय वायुसेना दलाच्या जवानांचे आभार मानले आहे.
आज देशात भारतीय वायुसेना दलाच्या वीर योद्धांना गौरविण्यासाठी तसेच शहीद झालेल्या शूर योद्धांचे स्मरण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले ज