Seetha Amma Temple Consecration Ceremony: श्रीलंकेत सीतामाईंना समर्पित सीता अम्मा मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी भारताकडून देण्यात आले शरयू नदीचे पाणी!
सीता अम्मा मंदिराचा अभिषेक सोहळा 19 मे रोजी होणार आहे.
सीतामाईंना समर्पित असलेल्या श्रीलंके मधील सीता अम्मा मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी भारताने पवित्र शरयू नदीचे पाणी श्रीलंकेला पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सीता अम्मा मंदिराचा अभिषेक सोहळा 19 मे रोजी होणार आहे. महंत शशिकांत दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, श्रीलंकेतील सीता अम्मा मंदिर ही सर्व 'सनातनी'साठी अभिमानाची बाब असेल.