भारतासाठी दिलासादायक बातमी! COVID19 च्या प्रकरणांमध्ये 4 महिन्यानंतर सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद

त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 88,74,290 वर पोहचला आहे. तर एकूण बळी 1,30,919 गेला आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या (Coronavirus) नव्याने 29,163 रुग्णांची नोंद होण्यासह 449 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 88,74,290 वर पोहचला आहे. तर एकूण बळी 1,30,919 गेला आहे. मात्र गेल्या 4 महिन्यातील ही सर्वाधिक कमी कोविड19 च्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी 14 जुलै रोजी 28,498 रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्राल आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 4,53,401 अॅक्टिव्ह रुग्ण असून 82,90,370 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट 93.42 टक्के आणि मृत्यूदर 1.47 टक्के आहे.(Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बहुतांश शहारांध्ये फटाक्यांवर बंदी तरीही नागरिकांकडून दिवाळीचे धुमधडाक्यात सेलिब्रेशन, पहा फोटो)

ICM यांनी सोमवारी 8,44,382 चाचण्या पार पाडल्या गेल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकूण चाचण्यांचा आकडा 12,65,42,907 वर पोहचला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा आकडा हा महाराष्ट्रात असून तो 17,49,777 वर गेला आहे. 46,034 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यात सध्या 85,363 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राजधानी दिल्लीत सोमवारी 3797 रुग्ण आढळले. त्यामुळे दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा 4,89,202 वर गेला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा सर्वाधिक आकडा हा आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशात आहे.(COVID19 वरील वॅक्सीन 94.5 टक्के प्रभावी, अमेरिकेतील Moderna Inc कंपनीचा दावा)

दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची आकडा कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. येथे यापूर्वी प्रतिदिनी 8,500 हून अधिक रुग्णांची भर पडली जात होती. दिवाळीच्या सणानंतर दिल्लीत 29,821 जणांच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. तर जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगच्या अपडेट आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळी जगभरात 5,48,26,772 रुग्णांची नोंद झाली असून 13,25,752 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.