Fourth Largest Stock Market: Hong Kong ला मागे टाकत भारताचं स्टॉक मार्केट जगातील चौथ्या क्रमाकांचं स्टॉक मार्केट - Bloomberg रिपोर्ट
तर हॉंगकॉंगचे हे च मूल्य सुमारे $4.29 trillion होते.
भारताच्या (India) स्टॉक मार्केटने Hong Kong च्या स्टॉक मार्केटला (Stock Market) मागे टाकत जगातील आघाडीच्या स्टॉक मार्केटच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. भारतामध्ये सार्या लिस्टेट शेअर्सचे एकूण मूल्य सोमवारी मार्केट बंद असताना $4.33 trillion होते. तर हॉंगकॉंगचे हे च मूल्य सुमारे $4.29 trillion होते. अशी माहिती Bloomberg च्या डाटामधून समोर आली आहे. 5 डिसेंबर रोजी स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन $4 ट्रिलियनच्या पुढे गेले, ज्यापैकी जवळपास निम्मे गेल्या चार वर्षांत आले, असे अहवालात नमूद केले आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता आधार आणि मजबूत कॉर्पोरेट कमाई यामुळे भारतीय इक्विटी वाढत आहेत. अहवालानुसार, जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि स्थिर राजकीय वातावरण आणि उपभोगावर चालणारी अर्थव्यवस्था यामुळे जागतिक भांडवल आणि कंपन्यांना आकर्षित करत भारत चीनसाठी एक व्यवहार्य पर्याय म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. नक्की वाचा: BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar: बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारी भांडवल प्रथमच USD 4 ट्रिलियन मार्कवर पोहोचले .
पहा ट्वीट
एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जसजशी वाढत जाते, तसतसे त्या देशाच्या मार्केट कॅपमध्येही वाढ होते... या देशातील उद्योजकांना हे समजले आहे. त्यामधून लिस्टिंगही वाढते. त्यामुळे गुंतवणूकदारांचे प्रमाणही वाढते. या अनेक घटकांचा परिणाम होत आता शेअर मार्केट वाढत असल्याची माहिती , Market Expert Sunil Shah यांनीही दिली आहे.
आशियाई आर्थिक केंद्र हा IPO साठी जगातील सर्वात व्यस्त ठिकाणांपैकी एक म्हणून आपला दर्जा गमावत आहे. बीजिंगचे कठोर अँटी-कोविड-19 नियम, कॉर्पोरेशनवरील नियामक कारवाई, मालमत्ता-क्षेत्रातील संकट आणि पश्चिमेसोबतचा भू-राजकीय तणाव या सर्वांनी एकत्रितपणे चीनचे जगात ग्रोथ इंजिन म्हणून अपील कमी केले आहे, असे ब्लूमबर्ग अहवालात नमूद केले आहे.