Kartavya Path Inauguration: 'भारतात नवे पर्व सुरु झाले', इंडिया गेटवर 'कर्तव्य पथ' उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार

हा मार्ग आगोदर राजपथ (Rajpath) म्हणून ओळखला जात असे.

Kartavya Path | (Photo Credit: ANI)

सेंट्रल व्हिस्टा (Central Vista) पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग असलेल्या इंडिया गेट (India Gate) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'कर्तव्य पथ' (Kartavya Path) मार्गाचे उद्घाटन केले. हा मार्ग आगोदर राजपथ (Rajpath) म्हणून ओळखला जात असे. त्याचेच नाव आता 'कर्तव्य पथ' असे करण्यात आले आहे. या उद्घाटनावेळी बोलताना देशात आता गुलामीची आठवण पुसली जावून नवे पर्व उदयास आले आहेत, असे उद्गार काढले.

कर्तव्य पथाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी पुनर्विकास प्रकल्पात गुंतलेल्या कामगारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी त्यांना (कामगारांना) सांगितले की 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्वांना ते आमंत्रित करतील.

पंतप्रधान मोदींनी आज इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. 28 फूट उंचीचा जेट ब्लॅक ग्रॅनाइटचा पुतळा इंडिया गेटजवळ छताखाली ठेवण्यात येणार आहे. या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आमच्या (पीएमओ) मते, हे पाऊल पूर्वीच्या राजपथावरून सत्तेचे प्रतीक असलेल्या 'कर्तव्य पथ'कडे सार्वजनिक मालकी आणि सशक्तीकरणाचे उदाहरण म्हणून बदलण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. (हेही वाचा, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य)

Kartavya Path | (Photo Credit: ANI)

ही पावले अमृत काळातील नवीन भारतासाठी पंतप्रधानांच्या दुसऱ्या पंचप्राणाच्या अनुषंगाने आहेत. वसाहतवादी मानसिकतेचा कोणताही पुरावा पूसून टाकायला हवा, असे उद्गारही पंतप्रधानांनी या वेळी काढले.

सेंट्रल व्हिस्टा नजीक राजपथ आणि लगतच्या भागात अभ्यागतांच्या वाढत्या रहदारीचा वर्षानुवर्षे दबाव होता. ज्यामुळे त्याच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत होता. सार्वजनिक शौचालय, पिण्याचे पाणी, रस्त्यावरील फर्निचर आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यात बदल करणे गरजेचे होते, असेही पंतप्रधान म्हणाले.