India vs West Indies 2019: भारतीय क्रिकेट संघ घोषीत; विराट कोहली याच्याकडे नेतृत्वाची धुरा, भुवनेश्वर कुमार याचे पुनरागमन
या संघात विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे कर्णाधार तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी आली आहे.
India Full Squad For West Indies ODIs and T20Is Series Announced: मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. ही घोषणा टी 20 आणि एकदिवसी क्रिकेट सामन्यांसाठी (Indies ODIs and T20Is Series) आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने ही घोषणा गुरुवारी केली. जाहीर झालेल्या संघावर नजर टाकता विराट कोहली पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या मालिकेत प्रवेश केला आहे. तर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar यालाही संधी मिळाली आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 6 डिसेंबर पासून तीन टी-20 (T20 आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची(ODIs) मालिका खेळली जाणार आहे. या संघात विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे कर्णाधार तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी आली आहे. कोलही याने बांग्लादेश विरुद्ध झालेल्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विश्रांती घेतली होती.
कोलकाता येथे निवडसमितीने संघ निवडीची घोषणा केली. या वेळी बीसीसीआय अध्यक्ष सैरभ गांगूली आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. हाती आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या दोघांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच, दोन्ही संघांमध्ये विशेष असा काहीही बदल करण्यात आला नाही. केदार जाधव याचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी असलेल्या संघात समावेश आहे. तर, वॉशिंगटन सुंदर याला 50 षटकांच्या प्रारुप संघात सहभागी करण्यात आले आहे. हा बदल वगळता दोन्ही संघातील खेळाडू समानच आहेत. (हेही वाचा, IND vs WI T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबई टी-20 सामन्यावर संकट, मुंबई पोलिसांनी मॅच इतरत्र हलवण्याची केली मागणी, जाणून घ्या कारण)
टी20 क्रिकेट संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार
एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार
मालिका वेळापत्रक
T20Is
1 ) टी 20 - वेळ 7 वाजता, स्थळ - मुंबई , दिनांक - 6 डिसेंबर 2019 (शुक्रवार)
2) टी 20 - वेळ 7 वजता, स्थळ - तिरुवनंतपुरम, दिनांक 8 डिसेंबर 2019 (रविवार)
3 ) टी 20 - वेळ 7 वाजता, स्थळ - हैदराबाद , दिनांक 11 डिसेंबर 2019 (बुधवार)
एकदिवसीय सामना वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना - 15 डिसेंबर 2019 (रविवार),स्थळ - चेन्नई, वेळ - दुपारी 2 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना - 18 डिसेंबर 2019 (बुधवार), स्थळ - विशाखापट्टनम, वेळ दुपारी 2 वाजता
तीसरा एकदिवसीय सामना - 22 डिसेंबर 2019 (रविवार), स्थळ - कटक, वेळ दुपारी 2 वाजता
बीसीसीआय ट्विट
क्रिकेट वर्तुळात चर्चा होती की, उपकर्णधार रोहित शर्मा याला या मालिकेत विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, तसे घडले नाही. रोहित याच्यावर असलेल्या कामाचा भार आणि जबाबदारी यांची विभागणी करण्यासाठी असे केले जाऊ शकते अशी चर्चा होती. रोहित गेली प्रदीर्घ काळ सलग खेळत आहे. त्यामुळे त्याच्याबाबत अशी चर्चा सुरु झाली होती.