COVID 19 Vaccination In India: भारतात एकूण कोविड 19 च्या लसींचा 100 कोटींंचा टप्पा पार; देशभरात होणार सेलिब्रेशन

भारता व्यतिरिक्त केवळ चीन मध्ये कोविड 19 लसीच्या लसीकरणामध्ये 100 कोटींचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. चीन मध्ये जून महिन्यात 100 कोटींचा टप्पा पार झाला आहे.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

भारतामध्ये कोविड 19 विरूद्ध जगातील सर्वात मोठे व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह (World's Biggest Vaccination Drive) लॉन्च केल्यानंतर आज 9 महिन्यांनंतर एकूण कोविड 19 लसींचा 100 कोटींचा टप्पा पार पाडण्यात देशाला यश मिळालं आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचा टप्पा सेलिब्रेट करण्यासाठी सरकार कडून विविध कार्यक्रमांची तयारी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी आज सकाळी दिल्लीत राम मनोहर लोहिया रूग्णालयाला भेट दिली तसे आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण मोहिमेत सहभागी सार्‍यांचे आभार मानले, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील मिठाई वाटून सेलिब्रेशन सुरू केले आहे.

कोविड 19 लसीच्या 100 कोटी टप्प्याच्या काही खास गोष्टी

BKC COVID HOSPITAL मधील सेलिब्रेशन

आतापर्यंत भारतात 18 वर्षांवरील 75% टक्के लोकांना कोविड 19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 31 टक्क्यांहून अधिक लोकं पूर्ण लसवंत आहेत. देशात 18-44 वयोगटातील 55,29,44,021 आणि 45-59 वयोगटातील 26,87,65,110 आणि 60 वर्षांवरील 1,69,82,430 जणांचे लसीकरण झाले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement