Independence Day 2020: देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पार पडलेल्या ध्वजवंदनाचे खास क्षण (Photos Inside)
विविध राज्यातुन ध्वजारोहणाचे सुंदर क्षण समोर येत आहेत.
देशात आज 15 ऑगस्ट च्या निमित्ताने सकाळपासुन प्रचंंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध राज्यातुन ध्वजारोहणाचे सुंदर क्षण समोर येत आहेत. आज सकाळी सर्वात प्रथम पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मध्ये लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंंतर सर्व राज्यांंच्या मुख्यमंंत्र्यांच्या हस्ते सुद्धा संबधित राज्यात हा कार्यक्रम पार पडला.महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मु आणि काश्मीर, छत्तिसगढ, कर्नाटक या राज्यातील ध्वजवंंदनाचे फोटो सध्या पाहायला मिळत आहेत. घर बसल्या या सर्व राज्यातील स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन अनुभवण्यासाठी आपणही हे फोटोज नक्की पाहा. Independence Day 2020 Wishes: स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा भारत स्वतंत्रता दिवस!
दिल्ली, पंंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण
महाराष्ट्र मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांंच्या हस्ते मुंंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बंंगल्यावर ध्वजारोहण पार पडले.
गृहमंंत्री अमित शाह यांंनी काल कोरोना मुक्त झाल्यावर आज दिल्ली मधील निवासस्थानी ध्वजारोहण केले.
राजस्थानचे मुख्यमंंत्री अशोक गेहलोत यांंनी जयपूरच्या एसएमएस स्टेडियमवर राज्यस्तरीय समारंभात ध्वजारोहण केले.
मध्य प्रदेशचे नुकतेच कोरोना मुक्त झालेले मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांंनी भोपाळ मध्ये झेंडावंदन केले.
जम्मू-काश्मीर मध्ये उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमध्ये राष्ट्रीय ध्वजारोहण केले.
छत्तीसगड येथे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते रायपूर येथे ध्वजारोहण पार पडले.
उत्तराखंड मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकविला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ यांंच्या हस्ते ध्वजारोहण
दिल्ली चे मुख्यमंंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवासस्थानी झेंडावंंदन केले.
पंंजाबचे मुख्यमंंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण
पुद्दुचेरी मध्ये मुख्यमंंत्री नारायणस्वामी यांंच्या हस्ते इंंदिरा गांंधी स्टेडियम मध्ये ध्वजारोहण
दरम्यान, आपणही आपल्या परिसरात, विभागात, इमारतीत झेंडावंंदन केले असलेच हो ना, तर त्याचे फोटो सुद्धा खाली कमेंटस बॉक्स मधुन आमच्या व सर्व वाचकांंच्या सोबत नक्की शेअर करा. आपणा सर्वांंना स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!