Landslide in Haryana's Bhiwani: दरड कोसळून 2 ठार, 15 ते 20 जखमी, 10 वाहनेही मातीखाली दबली; हरियाणातील भिवाणी येथील घटना
यात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. मातिच्या ढिगाऱ्याखाली 10 वाहनेही दबल्याचे वृत्त आहे.
हरियाणा (Haryana) राज्यातील भिवानी (Bhiwani) येथील खाण परिसर असलेल्या डाडम येथे दरड कोसळून (Landslide in Haryana's Bhiwani) मोठा अपघात घडला आहे. यात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. मातिच्या ढिगाऱ्याखाली 10 वाहनेही दबल्याचे वृत्त आहे. हरीयाणा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीत दोघाचा मृत्यू झाल्याचे म्हटले असले तरी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृतांच्या एकूण आकड्याची पुष्टी अद्याप होऊ शकली नाही.
घटनेनंतर कृषी मंत्री जेपी दलाल यांनी म्हटले की, काही या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्याचा नेमका आकडा मिळू शकला नाही. डॉक्टरांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आम्ही मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. पोलिसही घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना हिसार येथील रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती दलाल यांनी दिली. (हेही वाचा, Vaishno Devi Temple: वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी)
दरम्यान, प्राप्त झालेल्या अधिकाच्या माहितीनुसार, खणन उद्योगासाठी वापरण्यात येणारी पोकलँड आणि इतरही काही मशिन्स मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. अद्याप त्याचाही आकडा समजू शकला नाही. दरड स्वत:हूनच घसरली की एखादा स्फोट या दरड कोसळण्याचे प्रमुख कारण आहे याबाबत प्रशासन माहिती घेत आहे. तोशाम परिसरातील खानक आणि डाडम परिसरात मोठ्या प्रमाणावर खनन कार्य होते. वाढत्या प्रदुषणामुळे दोन महिन्यांपूर्वी खनन प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. एनजीटीने प्रदीर्घ काळानंतर गुरुवारीच हे खणन करण्यास पुन्हा परवानगी दिली होती. दोन महिन्यांपर्यंत खनन कार्य बंद राहिल्यामुळे आवश्यक सामग्रीचा तुटवडा भासत होता. हा तुटवडा दुर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून आणल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.