Weather Forecast India: 'विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस', IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या आजचे आणि उद्याचे हवामान

ज्यामध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी अचानक मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तवताना आयएमडीने म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पाहायला मिळू शकतो.

Rain and Weather Forecast | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय हवामान विभाग (IMD) ने देशभरातील विविध राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. ज्यामध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी अचानक मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तवताना आयएमडीने म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पाहायला मिळू शकतो. याशिवाय आजचे आणि उद्याचे हवामान (Weather Forecast for Tomorrow) सर्वसाधारण सारखेच राहण्याची शक्यताही व्यक्त करण्या आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर IMD ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशात सागरी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवसांत पूर्व आणि पूर्व-मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील प्रादेशिक हवामान केंद्राने हलका पाऊस आणि सामान्यतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 36°C आणि किमान 27°C राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. राष्ट्रीय राजधानीत पुढील पाच दिवस आकाश ढगाळ आणि वातावरणात गारवा राहील, असा हवामान अंदाज आहे.

दक्षिण द्वीपकल्पीय भारतासाठी IMD अंदाज

आयएमडीने काढलेले नवे पत्रक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये 21 ऑगस्टपर्यंत, आंध्र प्रदेशात 20 ऑगस्ट आणि कर्नाटकमध्ये 20, 24 आणि 25 ऑगस्टपर्यंत वेगळ्या मुसळधार पावसाचे संकेत देते. तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये 20 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी अपेक्षित आहे. या राज्यांमध्ये उद्याचे हवामान आजसारखेच राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Alert: राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज)

एक्स पोस्ट

पश्चिम आणि मध्य भारतासाठी IMD अंदाज

हवामान विभागाने जारी केलेल्या 19 ऑगस्ट रोजीच्या हवामान वृत्तामध्ये मध्य भारत, कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. आठवडाभरात मराठवाडा आणि गुजरातमध्ये तुरळक पाऊस अपेक्षित आहे. (हेही वाचा:Maharashtra Rain: राज्यात पावसाचा धुमाकुळ, पुण्यात अनेक भागात पाणी साचले; यवतमाळमध्ये दुचाकी वाहून गेल्या )

पूर्व आणि ईशान्य भारतासाठी IMD अंदाज

पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि झारखंडमध्ये 23 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओडिसातही 29 आणि 23 ऑगस्टला पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 20, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी तर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 24 ऑगस्टपर्यंत पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह काही भागांमध्ये दमदार पाऊस कोसळला आहे. राजधानी मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही काही ठिकाणी आज (20 ऑगस्ट) तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाठिमागील तीन ते चार दिवसांमध्ये सुरु झालेला उष्मा कमी झाला असून वातावरणात गारवा पसरला आहे.