IIT Madras च्या विद्यार्थ्याची हॉस्टेल रूम वर आत्महत्या; महिन्याभरातील दुसरी घटना
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचा बी टेक तिसर्या वर्षाचा एक विद्यार्थी मृतावस्थेमध्ये सापडला आहे.
आयआयटी मद्रासचा कॅम्पस (IIT Madras Campus) पुन्हा एका आत्महत्येनं (Suicide) हादरला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचा बी टेक तिसर्या वर्षाचा एक विद्यार्थी मृतावस्थेमध्ये सापडला आहे. त्याच्या रूममध्ये सुसाईड नोट आढळली आहे. ज्यामध्ये “Don’t prosecute”असं लिहलं आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार ही आत्महत्या आहे. मागील महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.
IIT Madras च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलाचं नाव V Pushpak Sreesai आहे. तो 21 वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील Cuddapah हे त्याचं मूळ गाव आहे. Alakananda Hostel मध्ये तो 3 रूममेट्स सोबत हॉस्टेलवर राहत होता. दरम्यान तो परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळत नसल्याने नैराश्यामध्ये होता. त्यामधूनच त्याने मित्र रूमवर नसताना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
पोलिसांनी एफआयआर रजिस्टर करून तपास सुरू केला आहे. 14 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील विद्यार्थी Steven Sunny ने देखील आत्महत्या केली होती. तो मास्टर डिग्रीचा अभ्यास करत होता.
IIT Madras ने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये या घटनांमध्ये आता विद्यार्थी, शिक्षक आणि Internal Inquiry Committee लक्ष देणार आहे. सोबतच या विद्यार्थ्याच्या पालकांना कळवण्यात आलं असून त्यांच्या प्रायव्हसीबाबत सार्यांनी जागृत रहावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.