IIT Kharagpur: आयआयटी खरगपूर कॅम्पसमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, केरळमधील बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षातील देविका पिल्लई नुकतीच कॅम्पसमध्ये परतली होती. मात्र, कॅम्पसमध्ये परतल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला.

IIT Kharagpur | (Photo credit: archived, edited, representative image)

आयआयटी खरगपूरमधील (IIT Kharagpur) 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह (Student Found Dead) कॅम्पसमध्ये सोमवारी सकाळी सापडला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, केरळमधील बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षातील देविका पिल्लई नुकतीच कॅम्पसमध्ये परतली होती. मात्र, कॅम्पसमध्ये परतल्यानंतर तिचा मृतदेह आढळून (IIT Kharagpur Student Found Dead on Campus) आला. सरोजिनी नायडू हॉल आणि इंदिरा गांधी हॉलच्या विद्यार्थ्यांना तिचा मृतदेह आढळून आला. विद्यार्थ्यांनी सांगितले की, तिचा मृतदेह दोन हॉलमधील जागेत सापडला. या घटनेची त्यांनी तत्काळ कॅम्पस अधिकाऱ्यांना माहिती दिली.

हत्या की आत्महत्या?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण आहे की आणखी काही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खरगपूर उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आमचे पथक सक्रीय झाले आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. दरम्यान, ही घटना संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर चिंता निर्माण करते. दरम्यान, IIT खरगपूर चौथ्या वर्षाच्या BTech विद्यार्थ्याच्या आत्महत्येबद्दल अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. उपलब्ध माहितीनुसार, विद्यार्थिनीने 2021 मध्ये IIT खरगपूरमध्ये प्रवेश घेतला होता. ती संस्थेत बायोटेक आणि बायोकेमिकल अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकत होती. (हेही वाचा, अमेरिकेतील नोकरी सोडून IIT विद्यार्थ्याने सुरु केला व्यवसाय; महिन्याला कमावतो 'इतके' कोटी)

दोन वर्षांपूर्वीही विद्यार्थ्याची आत्महत्या

दोन वर्षांपूर्वीही आयआयटी खरगपूर एका विद्यार्थ्याचा मृतदेह कुजलेल्या आवस्थेत कॅम्पसमध्येच आढळून आला होता. या विद्यार्थ्याची आई फैजान अहमदच्या आईने म्हटले आहे की, आम्हाला अद्यापही त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. दरम्यान, न्यायालयाने नियुक्त केलेल्या फॉरेन्सिक तज्ञाने अलीकडेच असे म्हटले की, आसाममधील अहमद या तरुणाला "एखाद्या वस्तूने मारून नंतर गोळी घातली असावी." दरम्यान, अलिकडे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 नुसार IIT खरगपूरला भारतातील तिसरी-सर्वोत्तम IIT आणि चौथी-सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून स्थान देण्यात आले आहे. ही क्रमवारी संस्थेच्या शिरपेचात नवा तुरा खोवते. (हेही वाचा, IIT Placement 2021: देशात प्लेसमेंटच्या बाबतीत IIT Kharagpur ने मोडले सर्व रेकॉर्ड; मिळाली तब्बल 2.4 कोटी पगाराची ऑफर)

आत्महत्या टाळण्यासाठी आणि मदतीसाठी हेल्पलाईन

दरम्यान, आत्महत्या हा कोणत्यारी प्रश्नावरचे अंतिम उत्तर असत नाही. आत्महत्या हा आपल्या दुर्बलपणाचा दाखला आहे. त्यामुळे कोणीही या मार्गाने जाऊ नये. जर आपणास अगदीच अस्वस्थ वाटू लागले किंवा आत्महत्येची लक्षणे दिसणाऱ्या कोणाला ओळखत असल्यास, योग्य समुपदेशनासाठी आत्महत्या प्रतिबंधक मंचांशी त्वरीत संपर्क साधा. तुम्ही हेल्पलाइन नंबर- 9152987821 वर संपर्क साधून मदत घेऊ शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif