Delhi Airport Roof Collapse: दिल्ली विमानतळावर Terminal 1 वरून झेपावणारी विमानं दुपारी 2 पर्यंत बंद; DGCA कडून प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना!
T1 वर सर्व बाधित प्रवाशांना मदत करण्याचा सल्ला त्यांनी विमानकंपन्यांना दिला आहे.
IGI Airport Terminal 1 Updates: दिल्ली (Delhi) मध्ये आज सकाळी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट (Indira Gandhi International Airport) वर छ्ताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर विमानतळावरील उड्डाणसेवा विस्कळीत झाली आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट च्या टर्मिनल 1 वरून आकाशात झेपावणारी सारी विमानं रद्द करण्यात आली आहे. दरम्यान यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून DGCA कडून विमानकंपन्यांना शक्य तितक्या प्रवाशांना आपल्या विमानात समाविष्ट करून घेण्याच्या आणि शक्य नसल्यास पूर्ण रिफंड देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान आज सकाळच्या दुर्घटनेनंतर टर्मिनल 3 आणि टर्मिनल 2 वरून सर्व निर्गमन आणि आगमन उड्डाणे सुरू राहणार आहेत. टर्मिनल 1 वर देखील आगमनाची उड्डाणे चालू आहेत. केवळ टर्मिनल 1 वरून निर्गमन करणारी उड्डाणं आज दुपारी 2 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत अशी माहिती दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कडून देण्यात आली आहे.
DGCA च्या सूचना
Civil Aviation चे केंद्रीय मंत्री Ram Mohan Naidu Kinjarapu यांनी आपण स्वतः या दुर्घटनेनंतर प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती X वर पोस्ट केली आहे. T1 वर सर्व बाधित प्रवाशांना मदत करण्याचा सल्ला त्यांनी विमानकंपन्यांना दिला आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून बचावकार्य अजूनही सुरूच आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. नक्की वाचा: Roof Collapsed at Delhi Airport: दिल्लीत आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत कोसळल्याची घटना, एकाचा दुर्दैवी मृत्यू.
दिल्लीत सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.