ICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर

आयसीएमआर (ICMR) तर्फे दुसरा सिरो सर्व्हे (Sero Survey) घेण्यात आला आहे याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांंनी माहिती दिली आहे ज्यात भारतीयांंच्या रोगप्रतिकारक शक्तीपासुन ते प्लाझ्मा थेरपी च्या वापरापर्यंत विविध बाबतीत डॉ. हर्षवर्धन यांंनी भाष्य केले आहे.

Coronavirus (Photo Credits: PTI)

केंद्रीय आरोग्यमंंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan)  यांंनी भारतातील कोरोना परिस्थितीविषयीचे(Coronavirus Update)  अपडेट दिले आहेत. काही दिवसांंपुर्वी आयसीएमआर (ICMR) तर्फे दुसरा सिरो सर्व्हे (Sero Survey) घेण्यात आला होता यात समोर आलेल्या माहितीनुसार भारतीयांंमध्ये अजुनही कोरोनापासुन वाचण्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली नाही परिणामी आपल्याला कोविड 19 काळात दिलेल्या खबरदारीच्या सुचनांंचे पालन करणे अजुन काही दिवसांंसाठी तरी आवश्यक असणार आहे. असेही डॉ.हर्षवर्धन यांंनी म्हंंटले आहे. याशिवाय ICMR तर्फे कोरोनाची पुन्हा लागण होण्याबाबत आणि Remdesivir व प्लाज्मा थेरपी (Plasma Therapy)  बाबत सुद्धा विशेष माहिती दिली आहे, याबाबत सविस्तर जाणुन घ्या. COVID-19 Diagnosis Update: कोविड-19 च्या अचूक निदानासाठी Equine Biotech कंपनीने तयार केले 'GlobalTM Diagnostic Kit'

डॉ.हर्षवर्धन यांंच्या माहितीनुसार, सध्या आयसीएमआर हे कोरोनाची दुसर्‍यांंदा लागण होण्याबाबत तपास करत आहे. सुदैवाने अजुन तरी पुन्हा लागण होण्याची प्रकरणे ही अगदी कमी आहेत. सरकार याही परिस्थितीकडे पुर्णतः लक्ष देऊन आहे. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे, कोरोनावरील लस सापडली नसताना उपचाराचा मार्ग म्हणुन अनेक वैद्यकीय तज्ञ Remdesivir आणि प्लाझ्मा थेरपी वापरण्यावर भर दिला जातोय मात्र सरकारतर्फे खाजगी तसेच सरकारी हॉस्पिटल ना हा वापर कमी केला जावा अशा सुचना दिल्या जात आहेत.

ANI ट्विट

(कोविड-19 'Gargle and Spit' टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या चाचणीच्या या पद्धतीबद्दल सविस्तर)

दरम्यान भारतात कोरोनाची स्थिती पाहता आता देशात एकुण आकडा 5,992,533 वर पोहचला आहे. मागील 24 तासांत 88,600 नव्या रुग्णांची भर पडली आहे, सद्य घडीला 9,56,402 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून 49,41,628 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 94,503 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Corona Alert Corona In India Coronavirus Coronavirus Cases In India Coronavirus Death Toll in India Coronavirus In Maharashtra Coronavirus Pandemic Coronavirus positive cases in India Coronavirus Recovery In Maharashtra Coronavirus Recovery Rate Coronavirus Recovery Rate In India Coronavirus Update Coronavirus Update in India Coronavirus updates COVID-19 Dr. Harshvardhan ICMR Plasma therapy Remdesivir Sero survey Union Health Minister Dr. Harshvardhan आयसीएमआर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन कोरोना रुग्ण कोरोना रुग्ण भारत कोरोना विषाणू कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस अपडेट्स कोरोना व्हायरस अलर्ट कोरोना व्हायरस भारत कोरोना व्हायरस मृत्यू कोरोना व्हायरस रुग्णसंख्या कोविड-19 प्लाझ्मा थेरपी भारत भारत कोरोना अपडेट भारत कोरोना रिकव्हरी रेट भारत कोरोना रुग्ण भारत कोरोना रुग्ण संख्या भारत कोरोना व्हायरस महाराष्ट्रात कोरोना महाराष्ट्रात कोरोना रिकव्हर रुग्ण सिरो सर्व्हे


Share Now