मुंबई येथून दिल्लीत आलेल्या ICMR मधील वरिष्ठ वैज्ञानिक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह

परंतु लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने काही गोष्टींसदर्भात नियम शिथील करण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने काही गोष्टींसदर्भात नियम शिथील करण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. याच दरम्यान आता आयसीएमआर मधील एका वरिष्ठ वैज्ञानिकाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. सदर वैज्ञानिक मुंबई येथून काही दिवसांपूर्वी दिल्लीत आले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे.

वैज्ञानिक मुंबईतील नॅशनल इंस्टीट्युट फॉर रिसर्ज इन प्रोडक्टिव्ह हेल्थ येथे कार्यरत आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मुंबई येथून काही कामानिमित्त आयसीएमआरच्या मुख्य कार्यलयात आले होते. तर या वैज्ञानिकांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर इमरातीचे निर्जंतुकीकरण करण्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(Coronavirus Update: कोरोना व्हायरसच्या 1,90,535 रुग्णांसह आज सर्वाधिक COVID 19 रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत 7 व्या स्थानावर, पहा यादी)

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 190535 वर पोहचला असून 5394 जणांचा बळी गेला आहे. तसेच 93322 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 91819 जणांची प्रकृती सुधारली आहे. देशभरासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत असल्याने सरकारने नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.