Hyderabad Shocker: प्रेयसीला मेसेज केला म्हणून मित्राची केली हत्या; हृदय बाहेर काढून गुप्तांगही कापले

यानंतर आरोपीने मृताचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि हाताची बोटेही कापली.

Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

हैदराबादमध्ये (Hyderabad) हत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका तरुणाने आपल्या मित्राचा गळा दाबून खून केला आहे. इतकेच नाही तर, त्याने आपल्या मित्राचा खून केल्यानंतर त्याचा शिरच्छेद करून हृदय बाहेर काढले. एवढेच नाही तर आरोपीने मृताचे गुप्तांग व बोटे कापली. प्रेयसीमुळे आरोपीने मित्राची इतकी निर्घृण हत्या केल्याचे समोर येत आहे. आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, नवीन आणि हरिहर कृष्णा यांनी दिलसुखनगर येथील महाविद्यालयात इंटरमिजिएटचे एकत्र शिक्षण घेतले होते. यावेळी नवीन त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला. नवीनने या मुलीसमोर आपले प्रेम व्यक्त केले आणि या मुलीनेही त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. परंतु काही काळानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले होते.

नवीनचा मित्र हरिहरलाही ती मुलगी आवडत होती. अशा परिस्थितीत नवीनचे तिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर हरिहरने मुलीशी बोलणे सुरू केले. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पोलिसांचे म्हणणे आहे की, ब्रेकअप होऊनही नवीन तरुणीला मेसेज करत असे, फोन करत असे. हरिहरच्या मनात याचा राग होता. नवीन आणि हरिहर  17 फेब्रुवारीला एकत्र दारू प्यायला बसले. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत दोघांमध्ये या मुलीवरून भांडण झाले. या भांडणात हरिहरने नवीनचा गळा आवळून खून केला. (हेही वाचा: Panipat Shocker: भावाच्या मदतीने नवऱ्याची हत्या, पत्नीसह पाच जण अटकेत)

हत्येनंतरही हरिहरचा राग शांत झाला नाही आणि त्याने नवीनच्या मृतदेहाचा शिरच्छेद करून त्याचे हृदय बाहेर काढले. यानंतर आरोपीने मृताचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि हाताची बोटेही कापली. हत्येनंतर हरिहरने मृतदेहाचे फोटो काढून प्रेयसीला पाठवले. त्यानंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.