Hyderabad Rape And Murder Case: सौदी अरेबिया, चीन यांसारख्या या '10' देशांमध्ये अशा पद्धतीने दिली जाते बलात्कारी व्यक्तीस शिक्षा

अशा लोकांना भररस्त्यात मारा, त्यांचे गुप्तांग कापून टाका, फाशी द्या अशा अनेक प्रकारच्या शिक्षा देण्याचे स्वरुप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अशा शिक्षा काही देशांत दिल्याही जातात.

Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

तेलंगणामध्ये (Telangana) महिला डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर तिला जाळल्याच्या निर्घृण कृत्याने सा-या देशाला हादरवून टाकलय. बलात्का-यांना अटक झाली असली तरी त्यांच्याविरोधात अजून कोणतीही कडक कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे भारतात सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोर कारवाई (Types of rapists punishment in other countries) करावी तसेच त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. मात्र आपल्या सरकार अजूनही ठोस भूमिका घेत नसल्याने देशभरात संतापाचे वातारण निर्माण झाले आहे.

भारतासारख्या देशात बलात्कारी व्यक्तीविरोधात काही ठोस पावले उचलली जात नसल्याने बलात्काराच्या घटना आणि ते करण्याचे स्वरूप दिवसेंदिवस खूपच क्रूर होत चालले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी झालेले निर्भया प्रकरण, कोपर्डी, खैरलांजी यांसारखी बरीच प्रकरणे अशी आहेत जी ऐकून ही अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. अशा लोकांना भररस्त्यात मारा, त्यांचे गुप्तांग कापून टाका, फाशी द्या अशा अनेक प्रकारच्या शिक्षा देण्याचे स्वरुप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अशा शिक्षा काही देशांत दिल्याही जातात.

पाहूयात कोणत्या देशात बलात्कारी व्यक्तीस कोणती शिक्षा होते ते:

1. इराण :

इराणमध्ये बलात्कार केल्यावर आरोपीला फाशी किंवा लोकांसमोर गोळी मारुन शिक्षा दिली जाते. यामध्ये जेव्हा पीडित आरोपीला माफ करते तेव्हा आरोपीला शिक्षेतून माफी मिळते. पण यानंतरही जन्मठेप दिली जाते. Hyderabad Rape And Murder Case: सोशल मीडियावर पीडितेचे नाव लिहिल्यास होऊ शकते दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

2. चीन :

चीनमध्ये बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूची शिक्षा दिली जाते. तर काही घटनांमध्ये आरोपीचे गुप्तांग कापून टाकले जाते.

3. अफगाणिस्तान :

अफगाणिस्तानमध्ये अशा गुन्ह्यात खूप कठोर शिक्षा दिली जाते. या देशात पीडितेला न्याय देण्यासाठी चार दिवसात आरोपीच्या डोक्यात गोळी मारुन त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाते.

4. सौदी अरब :

सौदी अरबमध्ये सर्वात कठोर कारवाई केली जाते. येथे या गुन्ह्यासाठी आरोपीचे डोके धडापासून वेगळे केले जाते. Hyderbad Gangrape: डॉक्टर युवतीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणी संतापाची लाट; आरोपींना कायदेशीर मदत न देण्याचा वकिलांचा निर्णय

5. दक्षिण कोरिया :

दक्षिण कोरियामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारची माफी दिली जात नाही. येथे आरोपीला गोळी मारुन मृत्यूची शिक्षा दिली जाते.

6. युएई :

या देशात बलात्कारासाठी फाशीची शिक्षा दिली जाते. सात दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाते.

7. इजिप्त :

येथे आरोपीला सर्वांसमोर फाशी दिली जाते. जेणेकरुन इतर कुणी हे कृत्य करणार नाही यासाठी सर्वांसमोर शिक्षा दिली जाते.

8. इराक :

इराकमध्ये आरोपीला दगडाने मारुन मृत्यूची शिक्षा दिली जाते. येथे बलात्कार करणाऱ्या आरोपीला तो मरेपर्यंत दगडाने मारले जाते.

9. फ्रान्स :

फ्रान्समध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला 15 वर्षांची शिक्षा दिली जाते. तसेच त्यामध्ये वाढ करुन ती 30 वर्षही केली जाऊ शकते.

10. नेदरलँड :

या देशात बलात्कार केला, तर 15 वर्षाची शिक्षा दिली जाते. तसेच वेश्या महिलेसोबतही बलात्कार केला तरीही आरोपीला शिक्षा दिली जाते.

देशात बलात्कार रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही बलात्कारासारखे प्रकार घडत असतात. आजही कुठे ना कुठे बलात्कार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. कठोर कायदे असूनही गुन्हेगारांना मृत्यूच्या शिक्षेची भीती नाही. यामागे एखादे वेगळे कारण असू शकते. या देशांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून यांसारख्या किंवा यापेक्षा वाईट शिक्षा भारतात बलात्का-यास दिली जावी अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif