Odisha Shocker: पत्नीने जेवणात अंडा करी न दिल्याने संतापला पती; डोक्यात लोखंडी पाईपने वार करून केली हत्या

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील कुटिलिंग गावात ही घटना घडली. 55 वर्षीय लामा बास्के यांनी त्यांच्या 41 वर्षीय पत्नी बसंती बास्के यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तथापि, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

Odisha Shocker: पत्नीने जेवणात अंडा करी न दिल्याने संतापला पती; डोक्यात लोखंडी पाईपने वार करून केली हत्या
Egg curry (PC - Wikimedia Commons)

Odisha Shocker: ओडिशातून (Odisha) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीची जेवणात अंडा करी (Egg Curry) न दिल्याने हत्या केली. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील कुटिलिंग गावात ही घटना घडली. 55 वर्षीय लामा बास्के यांनी त्यांच्या 41 वर्षीय पत्नी बसंती बास्के यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तथापि, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने महिलेच्या डोक्यात लोखंडी पाईपने केले वार -

पोलिसांनी सांगितले की, 41 वर्षीय महिलेच्या पतीने जेवणात अंडा करी न दिल्याबद्दल तिच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार केले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा - Solapur Shocker: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापूरातही 22 वर्षीय गर्भवतीची सासर च्या जाचाला कंटाळून आत्महत्या)

आरोपीने कबूनल केला गुन्हा -

उडाला पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बनमाली बारिक यांनी सांगितलं की, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तथापि, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उडाला उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मृत महिलेच्या आईने दाखल केली तक्रार -

या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तथापि, महिलेच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली.

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).