Homosexual Tutor: समलैंगिक शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थ्याकडून हत्या; अत्याचाराला कंटाळून टोकाचे पाऊल, आरोपीस अटक

तो समलैंगिक (Homosexual Tutor) होता. त्यातून तो या मुलाचे लैंगिक शोषण करत असे. सततच्या शोषणाला त्रासलेल्या मुलाने मग त्याची हत्या केली. आरोपीने आपल्या कृत्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे. अधिक तपासात अनेक गोष्टी पुढे येतील असे पोलिसांनी म्हटले आहे.

Homosexual Tutor: समलैंगिक शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थ्याकडून हत्या; अत्याचाराला कंटाळून टोकाचे पाऊल, आरोपीस अटक
Kill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Delhi Jamia Nagar news: दिल्ली येथील जामीया नगर येथून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर एका 28 वर्षीय खासगी शिक्षकाची हत्या केल्याचा आरोप आहे. वसीम असे या शिक्षकाचे नाव आहे. सांगितले जात आहे की, तो समलैंगिक (Homosexual Tutor) होता. त्यातून तो या मुलाचे लैंगिक शोषण करत असे. सततच्या शोषणाला त्रासलेल्या मुलाने मग त्याची हत्या केली. आरोपीने आपल्या कृत्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे. अधिक तपासात अनेक गोष्टी पुढे येतील असे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये दावा केला आहे की, वसीम काही काळापासून त्याच्यावर  समलैंगिक अत्याचार करत होता. तो केवळ अत्याचार करुनच थांबत नव्हता तर त्याने आरोपीसोबतच्या कृत्याचे व्हिडिओही बनवले होते. या व्हिडिओच्या आधारे तो आरोपीस ब्लॅकमेल करत असे.

पोलिसांनी सांगितले की वसीमने या कृत्याचे व्हिडिओ देखील बनवले होते आणि त्याचा वापर करून त्याला ब्लॅकमेल केले होते असा दावा अल्पवयीन मुलाने केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 30 ऑगस्ट रोजी पोलिसांना फोन आला की, वसीम नामक एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या शरीर आणि मानेवर खोलवर जखमा होत्या. त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला ती मालमत्ता वसीम याच्या वडिलांची होती. जी काही काळापासून रिकामी होती. पीडित महिला आपल्या कुटुंबासह झाकीर नगर येथे राहत होती.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन जामिया नगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेण्यात आला. पोलिसांनी संशयाच्या आधारे एका अस्पवयीनास ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, वसीमने अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. त्याने अल्पवयीन मुलासोबत या कृत्याचा व्हिडीओ बनवला होता. इतकेच नव्हे तर त्याने त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर तो व्हिडीओ सोशल मिडीयावर सोडण्याची धमकी देत असले.

वसीमने अल्पवयीन मुलाला 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास लैंगिक अत्याचारासाठी बोलावले होते. वारंवार होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलाने वसीमची धारदार पेपर कटरने हत्या केली. वसीमचा मोबाईल फोन, अल्पवयीन मुलाने घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे आणि बूटही या अल्पवयीन मुलाकडून जप्त करण्यात आले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2023 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).