
अहमदाबाद शहराच्या सायबर गुन्हे शाखेने (Ahmedabad City Cyber Crime Branch) सोमवारी सांगितले की, त्यांनी चेन्नई येथील एका 30 वर्षीय महिला तंत्रज्ञ महिलेला अटक केली आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देणाऱ्या तिच्या माजी सहकाऱ्याला अडकवण्यासाठी, तिने 12 राज्यांमध्ये 21 बनावट बॉम्ब धमक्या (Hoax Bomb Threats) पाठवल्या होत्या. रेने जोशिल्दा (Reni Joshilda) असे या महिलेचे नाव आहे. जोशिल्दा चेन्नईमध्ये डेलॉइटमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करत होती. तिने पाठवलेल्या खोट्या बॉम्ब धमक्यांच्या मेलमध्ये गुजरातमधील अनेक शाळा, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम आणि बीजे मेडिकल कॉलेजचा समावेश होता.
एका ईमेलमध्ये, जोशिल्दा हिने नुकत्याच झालेल्या एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमान अपघाताची जबाबदारीही घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे तिचा पुरुष सहकारी प्रभाकरवर खूप प्रेम होते, मात्र तो तिच्या भावनांबद्दल अनभिज्ञ होता. गेल्या दोन वर्षांपासून, प्रभाकरबद्दल तिचा ओढा इतका वाढला होता की, तिने त्याच्याशी संवाद साधणाऱ्या महिला सहकाऱ्यांनाही त्रास दिला. इतकेच नाही तर, तिने बनावट विवाह प्रमाणपत्रही बनवले आणि ते तिच्या ऑफिसमधील सर्व सहकाऱ्यांना वाटले.
फेब्रुवारी 2025 मध्ये प्रभाकरने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. त्यानंतर ती आणखी चिडली. संतापलेल्या रेनेने बदला घेण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून खोट्या बॉम्ब धमक्या पाठवण्याचा कट रचला. तिने प्रभाकरच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केले आणि डार्क वेब, व्हीपीएन, आणि व्हर्च्युअल नंबरचा वापर करून आपली ओळख लपवली. तिने प्रभाकर म्हणून 12 राज्यांतील 21 ठिकाणांना धमकीचे ईमेल पाठवले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आणि पोलिसांचे संसाधन वाया गेले. (हेही वाचा: Fake Bank Guarantee Scam: 183 कोटी रुपयांच्या बनावट बँक हमी घोटाळ्याचा पर्दाफाश; PNB व्यवस्थापकासह 2 जणांना CBI कडून अटक)
Hoax Bomb Threats:
#WATCH | Gujarat | Ahmedabad Cyber Crime unit has arrested a Chennai-based accused who was sending hoax bomb threats in different states
JCP Crime Branch, Sharad Singhal says, "...The main accused in the case is Reni Joshilda from Chennai. She is qualified in robotics and… pic.twitter.com/sch60WWTsP
— ANI (@ANI) June 23, 2025
रेनेने मे आणि जून 2025 मध्ये हे 21 धमकीचे ईमेल पाठवले, ज्यामुळे 12 राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. हे ईमेल्स विशेषतः धार्मिक उत्सव किंवा व्हीआयपी दौऱ्यापूर्वी पाठवले गेले, ज्यामुळे दहशत पसरण्याची शक्यता वाढली. अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांनी 3 जून 2025 रोजी जेनेव्हा लिबरल स्कूलला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सरखेज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. रेनेने डार्क वेब, व्हीपीएन, आणि प्रोटॉनमेलचा वापर करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एका चुकीच्या लॉगिनमुळे तिची ओळख उघड झाली, ज्यामुळे पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचता आले. 21 जून रोजी अहमदाबाद पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
तिच्याकडून डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे जप्त केले. रेनेने हे सर्व एकट्याने केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. तरीही, इतर कोणाचा सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. रेने यांनी तपासादरम्यान आपण प्रभाकरला अडकवण्यासाठी धमक्या पाठवल्याची कबुली दिली. पोलिसांनी 12 राज्यांतील सायबर क्राइम युनिट्ससोबत समन्वय साधून हा तपास पूर्ण केला. सह पोलीस आयुक्त (गुन्हे) शरद सिंघल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे एकतर्फी प्रेम प्रकरण होते. गेल्या दोन वर्षांत, जोशिल्डाने व्हीपीएनद्वारे किमान 80 नंबर खरेदी केले आहेत आणि तिने प्रभाकरच्या नावे असे इतरही अनेक शेकडो बनावट ईमेल आणि संदेश पाठवल्याचा संशय आहे.