Rafale Deal: राफेल डीलमध्ये हिंदुस्तान एयरोनॉटिक्स करु शकते पुनरागमन, फ्रान्सच्या Dassault Aviation कंपनीसोबत चर्चा सुरु
त्यामुळे अतिरिक्त ऑर्डरमध्ये यो दोन्ही कंपन्या एकमेकांना सहकार्य करु शकतात.
लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha elections 2019) मध्ये राफेल डील (Rafale Deal) हा एक निवडणुकीचा आणि तितकाच वादाचा प्रचंड मोठा मुद्दा झाला होता. गेल्या काही काळात हे वादळ बऱ्यापैकी शमले असले तरी, हे डील पुन्हा एकदा नव्या वळणावर आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तेव्हा आरोप केला होता की, केंद्रातील सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) प्रणीत एनडीए (NDA) सरकारने राफेल विमाने (Rafale Aircraft) निर्मिती करण्यासाठी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) कंपनीचा विचार न करता भलत्याच कंपनीला पाचारण केले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी नव्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, फ्रान्सची एयरक्राफ्ट निर्माती कंपनी दसॉ एविएशन (Dassault Aviation) आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात पुन्हा बोलणी सुरु झाली आहेत. ही बोलणी भारतात राफेल विमान निर्मिती करण्याबाबत सुरु असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
भारताने नुकतेच संकेत दिले की, आणखी काही राफेल फायटर जेट्स खरेदी करण्याची ऑर्डर देऊ शकतात. त्यामुळे अतिरिक्त ऑर्डरमध्ये यो दोन्ही कंपन्या एकमेकांना सहकार्य करु शकतात. सूत्रांच्या हवाल्याने इकोनोमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. यात अत्याधुनिक लढावू विमान राफेल च्या अतिरिक्त ऑर्डरवर कामाची विभागणी करण्याबाबत चर्चा झाली आहे. दोन्ही कंपन्यांनी नुकतीच आपल्या 2012 मधील भूमिकेपासून मागे हटकण्यात तयार नाहीत. या दोन्ही कंपन्यांमध्ये तेव्हा लोकलाइजेशन आणि प्रायसिंग या दोन मुद्द्यांवर बोलणी थांबली होती.
दोन्हीही विमान निर्माता कंपन्या असून, एकमेकांच्या जुन्या सहकारीही राहिल्या आहेत. नुकत्याच या दोन्ही कंपन्यांनी 2.1 अब्ज डॉलर च्या एका डीलवर मिळून काम केले होते. यात भारतीय वायू सेनेच्या मिराज 2000 च्या एका ताफ्याला अत्याधुनिक केले होते. जीफ ऑफ डिफेन्स स्टॉप किंवा सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच संकेत दिले होते की, भारत पुढच्या चार वर्षांमध्ये 36 अतिरिक्त विमानांच्या खरेदीची ऑर्डर देऊ शकतो. जर ही लढावू विमाने खरेदी केली जातात तर , त्याचे इतर भाग हिंदुस्तान एयरोनॉटिक्स कंपनीच्या प्लांटमध्ये बनले जाऊ शकतात. (हेही वाचा, राफेल डील: मोदी सरकारला अडचणीत आणणारे राहुल गांधी यांचे ५ प्रश्न)
दरम्यान, फ्रान्सची कंपनी दसॉ 36 राफेल जेटसाठी मिळालेली ऑर्डर पूर्ण करण्या कामी लागली आहे. रोफेल डील 7.8 अब्ज डॉलरमध्ये झाली होती. राफेल डीलच्या ऑफसेट क्लॉजनुसार कंपनीला कॉन्टॅक्ट प्राईजच्या 50 टक्के रक्कम भारतीय एयरोस्पेस आणि डिफेंन्स सेक्टरमध्ये गुंतवावी लागणार आहे. त्यानुसारच कंपनीने नागपूर येथे रिलायंन्स डिफेन्स सोबत पार्टनरशिपमध्ये एक कारखाना उघडला आहे. तिथे लवकरच विमानाची निर्मिती करण्यासाठीही काम सुरु केले जाणार आहे.