केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून Fake CoWIN App बाबत अलर्ट जारी; फसव्या अॅपच्या जाळ्यात न अडकण्याचं आवाहन
गूगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअर वर ते अद्याप उपलब्ध नाही.
भारतामध्ये Covaxin, Covishield या दोन कोविड 19 लसींना मंजुरी दिल्यानंतर आता भारतामध्ये नेमकी लसीकरणाची प्रक्रिया कशी आणि कधी सुरू होणार? याची चर्चा आणि उत्सुकता वाढली आहे. दरम्यान हे लसीकरण को विन सिस्टमवर रजिस्ट्रेशन करून होणार असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली असल्याने आता अॅप स्टोअर वर बनावट को विन अॅप्स येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान या कोविड 19 लसीकरणा मध्ये सामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून आता आरोग्य मंत्रालयाने एक अलर्ट जारी केला आहे. यामध्ये फसव्या आणि अनधिकृत को विन अॅप पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच सरकारकडून लवकरच अधिकृत को विन अॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. जेव्हा ते बाजारात येईल तेव्हा त्याची माहिती कळवली जाईल असेदेखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे कुणीच फसव्या कोविन अॅप किंवा कोविड 19 लसीकरणामध्ये अडकू नका. तसेच तुमची खाजगी माहिती शेअर करू नका असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं ट्वीट
CoWIN (COVID-19 Vaccine Intelligence Network)हे eVIN (Electronic Vaccine Intelligence Network)चं repurposed version आहे. याची निर्मिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि United Nations Development Programme (UNDP)यांनी मिळून केली आहे.
सध्या हे को विन अॅप प्री पोडक्शन स्टेज मध्ये आहे. गूगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअर वर ते अद्याप उपलब्ध नाही. पण ते अधिकृपणे लॉन्च झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाणार आहे. KaiOS वर देखील हे अॅप उपलब्ध करण्याची तयारी सुरू आहे.