Health Ministry questions legality Of Moose Wala Couple's IVF Treatment : Charan Kaur यांंच्या IVF Treatment बाबत अहवाल सादर करण्याचे केंद्राकडून पंजाब सरकारला निर्देश
भारतामध्ये कायदेशीररित्या आयव्हीएफ च्या मदतीने 21-50 वयोगटातील महिलाच आई होऊ शकतात असा कायदा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये Charan Kaur यांच्या आयव्हीएफ ट्रीटमेंट वर प्रश्न विचारण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने दिवंगत गायक सिद्धू मुसे वाला (Sidhu Moose Wala) याच्या आईने आयव्हीएफ (IVF) च्या मदतीने वयाच्या 58व्या वर्षी बाळाला जन्म दिल्याप्रकरणी पंजाब सरकार (Punjab Government) कडून रिपोर्ट मागवला आहे. भारतामध्ये कायदेशीररित्या आयव्हीएफ च्या मदतीने 21-50 वयोगटातील महिलाच आई होऊ शकतात असा कायदा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये Charan Kaur यांच्या आयव्हीएफ ट्रीटमेंट वर प्रश्न विचारण्यात आले आहेत. सिद्धूचे वडील Balkaur Singh यांनी बाळाच्या कागदपत्रासाठी आपल्याला त्रास दिला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
29 मे 2022 मध्ये सिद्धू मुसे वाला याची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यू पश्चात दोन वर्षांनी आता कौर दांपत्याने दुसर्या बाळाचं स्वागत केले आहे. मंत्रालयाने सांगितले की, 27 फेब्रुवारी रोजी वृत्तपत्रातील बातमीमधून चरण कौर यांनी गर्भधारणा करण्यासाठी IVF उपचारांची मदत घेतल्याचं समोर आलं आहे. Sidhu Moosewala आईने दिला मुलाला जन्म, वडील बलकौर सिंह यांनी दाखवली 'छोट्या सिद्धू'ची पहिली झलक .
मंगळवारी, सिद्धू मूसे वाला यांचे वडील बलकौर सिंग यांनी 17 मार्च रोजी त्यांचा दुसरा मुलगा जन्मल्यानंतर भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारवर छळ केल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले की ते त्यांना "बाळाची कागदपत्रे सादर करण्यास" सांगत होते.
"हे मूल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते माझी चौकशी करत आहेत," असे बलकौर सिंग यांनी इंस्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे. परंतू त्यांनी नमूद केले नाही की या जोडप्याने IVF उपचार वापरून त्यांचे दुसरे मूल या जगामध्ये आणले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याने सर्व कागदपत्रे सादर करणार असल्याचे बलकौर सिंग यांनी सांगितले आहे.
आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची घोषणा करताना, बलकौर सिंग यांनी गेल्या आठवड्यात त्याच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि तो निरोगी असल्याचे सांगितले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)