Hdfc Bank Stock Price: एचडीएफसी बँकेला मोठा धक्का, गुंतवणूकदारांचे 1 लाख कोटी बुडाले
एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये 12 टक्के घसरण झाली. यामुळं बँकेच्या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना तोटा सहन करावा लागला. शेअरची
भारतीय शेअर बाजारात (Share Market) गेल्या आठवड्यात मोठी घसरण पहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले. बॉम्बे स्टॉक एक्सेंजच्या (BSE) 30 शेअर्सच्या निर्देशाकांत 1148.8 अंकांची घसरण झाली. बीएसई मधील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांचं बाजारमूल्य घसरलं. या कंपन्यांच्या बाजारमुल्यात 1 लाख 67 हजार 936. कोटी रुपयांची घसरण झाली. सर्वाधिक नुकसान एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) गुंतवणूकदारांचं झालं.गेल्या सहा दिवसांत एचडीएफसी बँकेच्या गुंतवणुकदारांचं अधिक नुकसान झालं. (हेही वाचा - Share Market Today: शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणुकदारांना मोठा फटका)
एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये एक दोन नव्हे त सलग तीन दिवस घसरण पाहायला मिळाली. एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये 12 टक्के घसरण झाली. यामुळं बँकेच्या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना तोटा सहन करावा लागला. शेअरची किंमत घसरल्यानं बँकेचं बाजारमूल्य देखील घसरलं आहे. बँकेचं बाजारमूल्य 11 लाख 22 हजार 662.76 कोटी इतकं राहिलं. यानुसार गुंतवणूकदारांचे 1 लाख 22 हजार 163.07 कोटी रुपये बुडाले.
गेल्या आठवड्यात फक्त एचडीएफसी बँकेचं नुकसान झालं नाही, तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांचंही मोठं नुकसान झालं आहे. रिलायन्सच्या मार्केट कॅपिटलायजेशनमध्ये 18,199.35 कोटी रुपयांची घट होऊन 18,35,665.82 कोटी रुपये झाली आहे.