Covaxin लस घेऊनही कोविड-19 ची बाधा झालेले हरियाणाचे गृहमंत्री Anil Vij यांनी लसीबद्दल दिली 'ही' महत्त्वपूर्ण माहिती

पाहुया ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटले...

Haryana Cabinet Minister Anil Vij (Photo Credits: PTI)

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांना कोविड-19 (Covid-19) ची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी काल ट्विटच्या माध्यमातून दिली. विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी Covaxin लसीचा डोस घेतला होता. मात्र तरी देखील कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे एकंदर लसीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. परंतु, आज खुद्द अनिल विज यांनी लसीबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती ट्विटद्वारे शेअर केली आहे.

अनिल वीज यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "Covaxin घेण्यापूर्वी मला डॉक्टरांनी सांगितले होते की याचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर घ्यावा लागेल. त्यानंतर 14 दिवसांनी अँटीबॉडीज तयार होतील. पूर्ण खबरदारी घेतल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळेल. माझ्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत आणि मला ठीक वाटत आहे. मला लसीचा पहिला डोस घेऊन केवळ 14 दिवस झाले आहेत."

अनिल वीज ट्विट:

दरम्यान, अनिल विज यांना लस देऊनही कोरोनाची लागण झाल्यानंतर माध्यमांवर रंगू लागलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी भारत बायोटेक कडून स्पष्टीकरण देण्यात आले. कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी Covaxin चे दोन डोस घ्यावे लागतात. एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी लसीची क्षमता ठरवली जाईल. दोन्ही डोस घेतल्यानंतरच लसीचे परिणाम दिसून येतील, असे कंपनीने म्हटले आहे. (Covaxin लस घेऊनही हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर Bharat Biotech ने दिले 'हे' स्पष्टीकरण)

भारत बायोटेक आणि अनिल वीज यांनी दिलेली माहिती समान असल्याने Covaxin लसीबद्दलच्या  प्रश्न, चिंता दूर होण्यास नक्कीच मदत होईल. भारतातही लवकरच लस उपलब्ध होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, युके आणि बहरीन येथे परवानगी मिळालेल्या Pfizer लसीला भारतातही परवानगी देण्याचे मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif