Hardeep Singh Nijjar Murder Case: हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणी चौथ्या भारतीयास कॅनडामध्ये अटक

या प्रकरणात आतापर्यंत भारतीय व्यक्तीस कॅनडामध्ये झालेली ही चौथी अटक आहे.

Arrest | (Representative Image)

फुटीरतावादी खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी (Hardeep Singh Nijjar Murder Case) आणखी एक अटक (Canadian Authorities Arrest Fourth Indian National) केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत भारतीय व्यक्तीस कॅनडामध्ये झालेली ही चौथी अटक आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी या अटकेबाबत पुष्टी केली आहे. अधिकृत महिती देताना अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (IHIT) द्वारा अमनदीप सिंग या वयवर्षे 22 असलेल्या तरुणास अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर निज्जर याची हत्या आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक तपासादरम्यान कारवाईचा भाग

अधिकाऱ्यांनी माहिती देताना असेही म्हटले की, IHIT ने सांगितले की, 22 वर्षीय अमनदीप सिंग, ब्रॅम्प्टन, सरे आणि ॲबॉट्सफोर्ड येथे राहणारा एक भारतीय नागरिक, ओंटारियोमध्ये संबंधित बंदुकांच्या आरोपांसाठी आधीच कोठडीत होता. IHIT चे प्रभारी अधिकारी मनदीप मुकर यांनी सांगितले, हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये ज्यांनी भूमिका बजावली त्यांच्यापर्तंत पोहोचणे आणि त्यांना अटक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत झालेली अटक हा त्या कारवाईचाच भाग आहे. (हेही वाचा, USA On India-Canada Row: Hardeep Singh Nijjar हत्या प्रकरणात भारताचा हात असल्याचा कॅनडाकडून दावा होताच व्हाईट हाऊसकडून तत्काळ प्रतिक्रिया)

निज्जर त्या प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तींची नावे

अमनदीप सिंग याच्यासह आतापर्यंत चार जणांना या प्रकरणात  कॅनडा येथे अटक झाली आहे. करण ब्रार (22), कमलप्रीत सिंग (22), आणि करणप्रीत सिंग (28) आणि अमनदीप सिंग (वय-22) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांवर निज्जर याच्या हत्येचा आरोप होता. (हेही वाचा, Hardeep Singh Nijjar ची हत्या हा Coordinated Attack असल्याचं CCTV फूटेज मध्ये दिसतय - The Washington Post चा दावा)

काय आहे प्रकरण?

हरदीपसिंग निज्जर याच्यावर कॅनडा येथील सरे येथील गुरुद्वाराबाहेरच्या आवारात गोळीबार झाला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. उल्लेखनीय असे की, निज्जर याचे नाव भारत सरकारने जाहीर केलेल्या 40 दहशतवाद्यांच्या यादीत होते. या हत्येमुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय भूमिकेचा कॅनडाच्या आरोपानंतर भारत-कॅनेडियन संबंध बिघडले होते. भारताने याआधी ट्रूडो आणि त्यांच्या पक्षाला खलिस्तानींना आकर्षित करण्यासाठी व्होटबँकेच्या राजकारणाचा दोष दिला होता. या प्रकरणाचे पडसाद दीर्घकाळ उमटत राहीले.

हरदीपसिंह निंज्जर फुटीरतावादी गटाचा नेता

दरम्यान, हत्या झाली तेव्हा हरदीपसिंह निंज्जर हा 45 वर्षांचा होता. तो खलिस्तान समर्थक गटांचा नेता होता असे बोलले जात असे. शीखांचा स्वतंत्र देश असवा असा विचार बाळगणारा गट आणि चळवळीसाठी हरदीपसिंह काम करत असे तो शिख फॉर जस्टिस या संघटनेसह शीख डायस्पोरामध्ये अनधिकृत सार्वमत आयोजित करत असल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, त्याचा प्लंबिंगचा व्यवसाय देखील होता आणि व्हँकुव्हर उपनगरातील शीख मंदिर किंवा गुरुद्वाराचा अध्यक्षही होता. नेतृत्व केल्याचा संशय होता.