T Raja Singh in Preventive Custody: भाजपचे निलंबीत आमदार टी राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, हनुमान जयंती मिरवणुकीपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई

गोशामहलमधील हनुमान जयंती (Hanuman Jayanti) मिरवणुकीत सामील होण्याआधी जाण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केल्याचे टी राजा सिंह यांनी म्हटले आहे

MLA T Raja Singh | (File Image)

भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांनी पोलिसांनी त्यांना हैदराबादमध्ये अटक (Preventive Custody) केल्याचे म्हटले आहे. गोशामहलमधील हनुमान जयंती (Hanuman Jayanti) मिरवणुकीत सामील होण्याआधी जाण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केल्याचे टी राजा सिंह यांनी म्हटले आहे. आपण दरवर्षीच गोशामहल येथील राम मंदिर गोलिगुडा चमन हनुमान जंयतीत सहभाही होत असतो. यंदाही आपण हनुमान जयंती मिरवणुकीत सामील होण्याच्या तयारीत होता तेव्हा हैदराबाद पोलिसांनी त्याला पकडले, असे सिंह यांनी म्हटले आहे.

टी राजा सिंह यांनी पुढे म्हटले आहे की, मला प्रशासन आणि पोलिस खात्याला विचारायचे आहे की मी हिंदू म्हणून माझ्या मतदारसंघातील भगवान हनुमानाच्या मिरवणुकीत भाग घेऊ शकत नाही का?. केवळ आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे. आपणास आपल्याच मतदारसंघातील सांस्कृतीक आणि धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही टी राजा सिंह म्हणाले. (हेही वाचा, राम नवमीच्या शोभा यात्रेत वादग्रस्त वकत्व्य करणाऱ्या भाजपच्या टी राजा विरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल)

दरम्यान, या आधी पाठिमागील महिन्यात आमदार टी राजा सिंहयांनी ३० मार्चला रामनवमी साजरी करण्यासाठी मोठी मिरवणूक काढली होती. त्यांच्या कथित वादग्रस्त विधानांबद्दल त्यावेळी एफआयआर दाखल करण्यात आला होता. निलंबीत आमदारावर दोन समुदायांना एकमेकांविरोधात भडकावल्याचा आरोप होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मिरवणुकीदरम्यान शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ट्विट

टी राजा सिंह हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा जागेचे प्रतिनिधित्व करतात. सर्वात अलीकडील विधानसभा निवडणुकीत, तेलुगु देसम पक्षासह राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या या नेत्याने भाजपसाठी राज्य आमदार म्हणून एक जागा जिंकली. पैगंबर मुहम्मद विरोधी विधानांभोवतीच्या वादामुळे त्यांना भाजपमधून नऊ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. 2020 मध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामने त्याचे अकाउंट बॅन केले होते.