खलिस्तानी आतंकवादी Gurpatwant Singh Pannun ने मैदानात Virat Kohali ला मिठी मारण्याचा प्रयत्न करणार्‍या ऑस्ट्रेलियन नागरिकाला जाहीर केलं 10 हजार डॉलर्सचं बक्षीस!

त्याच्या दाव्यानुसार या नागरिकमुळे भारताची पॅलेस्टाईन बाबतची भूमिका उघड झाली आहे.

Wen Johnson । Twitter

खलिस्तानी आतंकवादी आणि सिख फॉर जस्टिसचा प्रमुख Gurpatwant Singh Pannun ने पुन्हा भरताविरूद्ध दंड थोपटले आहेत. पन्नू ने अहमदाबाद मध्ये काल झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या विश्वषकाच्या सामन्यात मैदानात विराट कोहलीला (Virat Kohli) मिठी मारण्याचा प्रयत्न करणार्‍या ऑस्ट्रेलियन नागरिकाला 1 हजार डॉलर्सचं बक्षीस जाहीर केले आहे. वेन जॉन्सन असं या ऑस्ट्रेलियन नागरिकाचं नाव असून त्याने मैदानात येऊन गाजा आणि फिलीस्तान विरूद्ध भारताची असलेली भूमिका समोर आणल्याचं म्हटलं आहे.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या काल वर्ल्डकप मधील अंतिम सामन्यामध्ये 14 व्या ओव्हर मध्ये एक पॅलेस्टाईन समर्थक अचानक मैदानात आला त्याने विराटला भेटण्याचा प्रयत्न केला. ही स्टेडियम वरील सुरक्षेतील महत्त्वाची चूक होती. अशाप्रकारे आलेल्या व्यक्तीला विराटने बाजूला नेले नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिस तपासात त्याने स्वतःचं नाव वेन जॉन्सन असल्याचं सांगितलं आणि तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक असल्याचं म्हटलं आहे. IND Vs AUS, World Cup Final: भारत ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यात मैदाना शिरलेल्या व्यक्तींला पोलिसांनी घेतले ताब्यात .

वेन जॉन्सन चं मैदानात आल्यनंतर पन्नूचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो आपण जॉन्सनच्या मागे उभे राहत असल्याचं जाहीर करतो असं म्हटलं आहे. यापूर्वी पन्नूने व्हिडिओ शेअर करत वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अडथळा आणणार असल्याचीही धमकी दिली होती.

फ्री पॅलेस्टाईन समर्थक 

मैदानात गेलेल्या त्या ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या शर्ट वर ' फ्री पॅलेस्टाईन ' असं लिहलं होतं. तो विराटचा चाहता असल्याचं त्याने पोलिस तपासात सांगितलं आहे तसेच तो फिलिस्तीनचा देखील समर्थक आहे.

Gujarat Cricket Association च्या मैदानावर चूकीच्या पद्धतीने आल्याने अहमदाबाद पोलिसांनी सध्या वेन वर कलम 332, 447 अंतर्गत कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे.