गुजरात: PUBG खेळण्यावरून वडीलांनी दम भरल्याच्या रागात मुलाने विषारी कीटकनाशक पिऊन संपवला जीव

गुजरात मध्ये एका 17 वर्षीय मुलाने पबजी खेळण्यावरून वडीलांनी दम भरला म्हणून आत्महत्या केल्याचा एक प्रकार समोर आला आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

गुजरात (Gujrat) मध्ये एका 17 वर्षीय मुलाने पबजी (PUBG)  खेळण्यावरून वडीलांनी दम भरला म्हणून आत्महत्या केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील आहे. दरम्यान हा मुलगा 11वी मध्ये शिकत होता. त्याने शेतामध्ये जाऊन कीटकनाशक पिऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची पोलिस तक्रार नोंदवण्यात आली आहे.

PTI च्या वृत्तानुसार, आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील हे शिक्षक होते. मुलगा तासन तास मोबाईल मध्ये पबजी खेळत असल्याने त्याला ओरडा पडला. मात्र यानंतर तो रागाच्या भरात घराबाहेर पडून शेतामध्ये गेला. तेथे त्याने विषारी कीटक नाशक प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अपघाती निधन अशी तक्रार करण्यात आली आहे. PUBG Ban Funny Memes and Jokes: सरकारकडून पबजी गेमवर बंदी घातल्याने Twitterati वर पालकांनी व्यक्त केला आनंद तर युजर्सच्या चेहऱ्यावरील नाराजी दाखवणारे मजेशीर मेम्स व्हायरल

दरम्यान कालच केंद्र सरकारने 118 अ‍ॅप सह पबजी खेळावरही बंदी घातली आहे. तरूणाईमध्ये पबजीची क्रेझ आहे. अनेकांनी या खेळाच्या नादामध्ये आपला जीव गमावला आहे.