गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली 69व्या वाढदिवसादिवशी आई हीराबेन यांची भेट

सोबतच दुपारचे जेवणही त्यांनी एकत्र केले आहे. सध्या सोशल मीडियामध्ये त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

Happy Birthday Narendra Modi:  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज ( 17 सप्टेंबर) त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच त्यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. नरेंद्र मोदी आज जन्मदिनी गुजरात दौर्‍यावर आहेत. सकाळी सरदार सरोवर डॅमची पाहणी आणि त्यानंतर केवाडिया येथील रॅलीला संबोधित केल्यानंतर आता पंतप्रधान त्यांच्या मातोश्री हीराबेन (Heeraben) यांच्या भेटीला पोहचले आहे. आज दुपारी गांधीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आईचे आशीर्वाद घेतले सोबतच दुपारचे जेवणही त्यांनी एकत्र केले आहे. सध्या सोशल मीडियामध्ये त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. PM Narendra Modi 69th Birthday Special: वाराणसीच्या संकट मोचन मंदिरामध्ये मोदी चाहता अरविंद सिंह कडून 1.25 किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण

नरेंद्र मोदी सुमारे अर्धा ते पाऊण तास त्यांच्या आईसोबत होते. यापूर्वी मोदींनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये बहुमत मिळवत पुन्हा सरकार स्थापन करण्यापूर्वी शपथग्रहण करण्याआधी आईचा आशिर्वाद घेतला होता. मोदी काल रात्रीच गुजरातमध्ये पोहचले होते. मोदी आज त्यांच्या आईला भेटण्यासाठी येणार ही माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी घराबाहेर मोठी गर्दी केली होती. यामध्ये आबालवृद्धांचा समावेश होता. चाहत्यांसोबत सेल्फी काढत, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

आज सकाळपासून नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही कला, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.