गुजरात: भूज मधील मुलींच्या कॉलेजमध्ये वसतिगृहाच्या वॉर्डनच्या तक्रारीवरून मुलींची अंतवस्त्र उतरवली; मासिकपाळी दरम्यान मंदिर आणि किचनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप

मासिकपाळी दरम्यान पाळल्या जाणार्‍या काही धार्मिक रूढी-परंपरांना छेद दिल्याची तक्रार वसतीगृहाच्या प्रमुखाने मुख्यध्यापकाकडे केल्यानंतर ही परेड घेण्यात आली आहे.

Students Forced to Remove Undergarments in Bhuj College (Photo Credits: Youtube/@TV9 Gujarati)

आज 21 व्या शतकात मुलाच्या खांद्याला खांदा लावून सार्‍याच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नवनव्या शिक्षण संस्था काम करत आहेत. परंतू गुजरातमधील भूज मध्ये एका शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हॉटेलमध्ये मुलींना मासिकपाळी आली आहे का? हे तपासण्यासाठी त्यांची अंतवस्त्र काढून तपासणी झाल्याचा दावा एका मीडीया रिपोर्ट मधून समोर आला आहे. दरम्यान 'श्री सहजानंद गर्ल्स हॉस्टेल' (Shree Sahajanand Girls Institute)  मध्ये अंडर ग्रॅज्युएट 68 मुलींची परेड करण्यात आली आहे. मासिकपाळी दरम्यान पाळल्या जाणार्‍या काही धार्मिक रूढी-परंपरांना छेद दिल्याची तक्रार वसतीगृहाच्या प्रमुखाने मुख्यध्यापकाकडे केल्यानंतर ही परेड घेण्यात आली आहे.

काहींनी केलेल्या तक्रारीनुसार मासिकपाळी आलेल्या काही मुली स्वयंपाकगृह आणि मंदिरामध्ये पोहचल्या. त्यांनी इतर मुलींनाही स्पर्श केला. दरम्यान या गोष्टी मासिकपाळीच्या काळात निषिद्ध असतात. भूजमध्ये स्वामिनारायण मंदिराच्या शिष्यांकडून चालवल्या जाणर्‍या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. या महाविद्यालयामध्ये बीए, बीकॉम, बीएसस्सी अशा कोर्समध्ये 1500 विद्यार्थी शिकतात. त्यापैकी 68 जणींची वॉशरूममध्ये तपासणी करण्यात आली.

 Ahmedabad Mirror च्या वृत्तानुसार, एका विद्यार्थीने दिलेल्या माहितीनुसार काल (13 फेब्रुवारी) दिवशी वर्गामध्ये क्लास सुरू असताना वसतिगृह प्रमुख आल्या आणि त्यांनी विद्यार्थीनींना वॉशरूममध्ये बोलावून त्यांना मासिकपाळी आली की नाही हे तपासण्यासाठी अंतवस्त्र काढण्याची सक्ती करण्यात आली होती असा दावा करण्यात आला आहे. या विद्यार्थीनी 12 वी इयत्तेमध्ये शिकत होत्या. या प्रकाराबद्दल अद्याप कोणतीही पोलिस तक्रार करण्यात आलेली नाही. ही बाब धार्मिक गोष्टींशी निगडीत असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थीनींना आणि त्यांच्या पालकांना ब्लॅकमेल करत हा प्रकार पोलिस स्टेशनमध्ये घेऊन न जाण्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मीडियाशी बोलताना देण्यात आलेल्या माहितीमध्ये SSGI trustee P H Hirani यांनी हा प्रकार नींदानीय असल्याचं सांगत याबाबत कडक कारवाई केली जाईल असे सांगितले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif