Gujarat Election 2022: गुजरातमध्ये भाजपला धक्का; निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री जय नारायण व्यास यांची पक्षाला सोडचिठ्ठी
गुजरात भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिग्गज नेते, माजी आरोग्य मंत्री आणि चार वेळा आमदार राहिलेले जय नारायण व्यास (Jay Narayan Vyas) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election 2022) तोंडावर राज्य भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिग्गज नेते, माजी आरोग्य मंत्री आणि चार वेळा आमदार राहिलेले जय नारायण व्यास (Jay Narayan Vyas) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. जय नारायम व्यास यांनी पुढील निर्णय अद्याप जाहीर केला नाही. परंतू, 'आप'ल्याला सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते काँग्रेस (Congress) किंवा आम आदमी पार्टी (AAP) मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
जय नारायण व्यास यांनी म्हटले आहे की, मी भाजपला कंटाळलो होतो आणि म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मी माझे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. मी सिद्धपूर मतदारसंघातून आगामी गुजरात निवडणूक लढवणार आहे. हिंदुस्तान टाईम्ससोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (हेही वाचा, Gujarat Assembly Election 2022 Schedule: गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या, तारीख, मतोजणी आणि अचारसंहिता)
जय नारायण व्यास यांनी दिलेल्या राजीनाम्यात व्यक्तिगत कारणामुळे पक्ष सोडत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या आटीवर सांगितले की, व्यास यांनी सिद्धपूरमधून उमेदवारी देण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे.
काँग्रेस नेत्याने पुढे म्हणाले की, अनेक सर्वेक्षणातून सिद्धपूर जागेसाठी ते अजूनही सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार आहेत. व्यास यांनी येथून सात वेळा निवडणूक लढवली असून चार वेळा विजयी झाले आहेत. 2017 मध्ये त्यांना ही जागा राखता आली नाही आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार चंदाजी ठाकोर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.