गुजरात: घोड्यावरुन वरात काढल्याने गावाकडून दलित परिवारासह समाजावर बहिष्कार

गुजरात येथे एका दलित परिवाराने त्यांच्या मुलाची लग्नाची वरात घोड्यावरुन काढल्याने गावातील मंडळींनी त्यांच्यावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

फोटो सौजन्य- Pixaboy

गुजरात येथे एका दलित परिवाराने त्यांच्या मुलाची लग्नाची वरात घोड्यावरुन काढल्याने गावातील मंडळींनी त्यांच्यावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या दलित परिवारासोबत संबंध ठेवल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल असा निर्णय सरपंचांनी घेतला आहे.

ल्होर येथे राहणार मेहुल याचा विवाह सोहळा झाल्यानंतर वरात काढण्यात आली होती. तर मेहुल हा दलित असून त्याची घोड्यावरुन वरात काढणे हे गावातील उच्चवर्णीयांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी सरपंचांच्या मदतीने गावातील अन्य दलित कुटुंबांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.(झारखंड: जमशेदपूर येथे अँटी करप्शन ब्युरोचा अधिकारी असल्याचे सांगत महिलेकडे पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तीला महिलेने दिला बेदम चोप (Watch Video)

तसेच दलितांना गावातील उच्च वर्णीयांकडून पाणी, दूध, भाज्यांसारख्या वस्तू दिल्या नाहीत. मात्र मेहुल याच्या परिवाराने गावातील सरपंचांनी बहिष्कार टाकल्यामुळे पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून सरपंच यांच्यासह अन्य 4 जणांना अटक केली आहे.