GST Collection: ऑक्टोंबर महिन्यात 1,30,127 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 24 टक्क्यांनी वाढ

सणाच्या दिवसात लोक जबरदस्त शॉपिंग करतात. यामुळे ऑक्टोंबर महिन्यात एकूण किती जीएसटी कलेक्ट करण्यात आला याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

GST Collection: सणासुदीच्या काळात वाढती मागणी पाहता त्याचा थेट परिणाम जीएसटी वसूलीवर झाल्याचे दिसून आले आहे. सणाच्या दिवसात लोक जबरदस्त शॉपिंग करतात. यामुळे ऑक्टोंबर महिन्यात एकूण किती जीएसटी कलेक्ट करण्यात आला याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. ऑक्टोंबर महिन्यात जीएसटी कलेक्शन 1,30,127 कोटी रुपये झाला आहे. त्यामध्ये सीजीएसटी 23,861 कोटी आणि एचजीएसटी कलेक्शन 30,421 कोटी रुपये झाले आहे. ऑक्टोंबर महिन्यात IGST कलेक्शन 67,361 कोटी रुपये आणि सेसच्या आधारावर 8484 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

जीएसटी लागू केल्यानंतर जीएसटी वसूलीचा हा दुसरा सर्वाधिक मोठा रेकॉर्ड आहे. सर्वाधिक जीएसटी कलेक्शन  एप्रिल 2021 मध्ये झाले होते. तेव्हा 1.41,384 कोटी रुपये जीएसटी कलेक्शन करण्यात आले होते. गेल्या वर्षात ऑक्टोंबर, 2020 च्या तुलनेत यंदा 24 टक्के अधिक कलेक्शन झाल्याचे दिसून आले आहे. तर 2019-20 मध्ये ऑक्टोंबर महिन्यापेत्रा 36 टक्के अधिक आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या दरम्यान, गुड्सच्या आयातीमधील एकूण महसूल 39 टक्के अधिक होते.(Digital Life Certificate: SBI Pensioners ला यंदा व्हिडिओ कॉल द्वारा लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा) 

जीएसटी कलेक्शनच्या या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, देशाची अर्थव्यवस्था ही काही प्रमाणात रुळावर येत आहे. अर्थमंत्रालयाने जीएसटीची आकडेवारी जाहीर करत असे ही म्हटले की, सेमीकंडक्टरची कमी झाली नसती तर कारची विक्री अधिक झाली असती. त्यामुळे जीएसटी कलेक्शन अधिक झाला असता.