Gram Panchayat Election: कुत्रा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी चक्क Entrance Exam, गावकऱ्यांनी उमेदवारांना फोडला घाम
उमेदवारीसाठी इच्छुकांच्या बहुगर्दीला तोटा नाही. कुत्रा ग्रामपंचायत सरपंच (Kutra Gram Panchayat) पदासाठीसुद्धा अशीच रस्सीखेच सुरु होती. मग गावकऱ्यांनी अशी काही शक्कल लढवली की, उमेदवारांना घामच फुटला. होय, ओडीशा (Odisha) राज्यातील सुंदरगढ (Sundargarh) जिल्ह्यातील कुत्रा ग्रामपंचायत जोरदार चर्चेत आली आहे.
निवडणूक कोणतीही असो. उमेदवारीसाठी इच्छुकांच्या बहुगर्दीला तोटा नाही. कुत्रा ग्रामपंचायत सरपंच (Kutra Gram Panchayat) पदासाठीसुद्धा अशीच रस्सीखेच सुरु होती. मग गावकऱ्यांनी अशी काही शक्कल लढवली की, उमेदवारांना घामच फुटला. होय, ओडीशा (Odisha) राज्यातील सुंदरगढ (Sundargarh) जिल्ह्यातील कुत्रा ग्रामपंचायत जोरदार चर्चेत आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) इच्छूक उमेदवारांसाठी गावकऱ्यांनी चक्क प्रवेश परीक्षा (Entrance Exam) ठेवली. विशेष म्हणजे सकाळी सुरु झालेली ही परीक्षा रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहिली.
कुत्रा ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सांगितले की, मालुपाडा गावातील नागरिकांनी गावातील एका शाळेत ग्रामसभा आयोजित केली. या परीक्षेत जवळपास 9 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. या ठिकाणी येत्या 18 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे.
आणखी एका उमेदवाराने प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, परीक्षेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले. जसेकी, उमेदवार निवडणूक का लढतो आहे. त्यामागे त्याचा कोणता उद्देश आहे. सरपंच पदासाठी आपण निवडणूक लढवणार आहात तर त्यासाठी आपली पाच उद्दीष्टे सांगा. या आधी आपण कोणकोणत्या सामाजिक कामात सहभागी झाला आहात, असे अनेक प्रश्न उपस्थीत केले जात होते. (हेही वाचा, Mithun Chakraborty: नक्षलवादी ते अभिनेता, खासदार आणि आता थेट राजकीय नेता; मिथून चक्रवर्ती यांच्याबाबत जाणून घ्या थोडक्यात)
दरम्यान, या परिसरातील गट विकास अधिकारी आणि निवडणूक अधइकाीर रबिंदा सेठी यांनी म्हटले की, अशा परीक्षेला कोणताही अधिकृत दर्जा नाही. मी या परीक्षेबाबत ऐकले आहे. परंतू, अशा प्रकारची कोणताही अधिकृत तक्रार अथवा माहिती आमच्यापर्यंत आली आहे. जर कोणाची तक्रार आमच्यापर्यंत आली तर आम्ही जरुर चौकशी करु.