Coronavirus Lockdown दरम्यान अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांंना केंद्र सरकारचा दिलासा; Asymptomatic असल्यास राज्यातच कामाच्या ठिकाणी पोहचवण्यास मदत करणार
असं केंद्रीय गृहविभागाने स्पष्ट केलं आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान अचानक भारतामध्ये संचारबंदी घोषित केल्याने अने मजूरशहराच्या विविध भागात, कुटुंबियांपासून लांब अडकून पडले आहेत. अशा गरीब मजूरांचं पोटं रोजंदारीवर असल्याने त्यांना घरी परतण्याचे वेध लागले आहेत. मात्र 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने त्यापूर्वी केंद्रशासित प्रदेश किंवा भारताच्या विविध राज्यांच्या कानाकोपर्यात अडकलेल्या मजुरांना हलवले जाणार नसल्याची माहिती केंद्रीय गृह विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र आता राज्यामध्येच काही Asymptomatic मजुरांना कामाच्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांचं स्क्रिनिंग करून कामाच्या ठिकाणी पोहचायला मदत केली जाऊ शकते. असं केंद्रीय गृहविभागाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये वांद्रे स्टेशनवर कामगार मूळ गावी परत जाण्यासाठी एकत्र जमले होते. त्यावेळेस आम्हांला जेवायला नको घरी जाऊ द्या अशी मागणी करण्यात आली होती. वांद्रे प्रमाणेच गुजरातमधील सुरत आणि दिल्लीच्या काही भागातूम, पुण्यातून अनेक मजुर मूळ गावी जाण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यासाठी केंद्राकडून बंदी घालण्यात आली आहे.
ANI Tweet
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मजुरांना दिलासा देत जेथे आहात तेथेच थांबा. महाराष्ट्रात तुम्ही सुरक्षित आहात. लवकरच केंद्र सरकारच्या मदतीने तुमची व्यवस्था केली जाऊ शकते. हळूहळू मुंबई, पुण्यामध्ये कामधंदे, उद्योग, व्यवसाय टप्प्या टप्प्याने सुरू होईल. असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संयम बाळगा असे केंद्र आणि राज्य शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.